Maharashtra Election 2019: 'सगळे पैलवान चालले; या वयातही एकटं प्रचाराला फिरावं लागतंय'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 01:12 PM2019-10-18T13:12:52+5:302019-10-18T13:14:58+5:30
बारामती विधानसभा निवडणूक २०१९ - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी राहायला तयार नाही, शरद पवारांची अवस्था शोल सिनेमातील जेलरसारखी झाली आहे.
बारामती - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला शेवटच्या टप्प्यात रंग चढू लागला आहे. बारामती या मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. शरद पवार म्हणतात मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, मी पैलवान तयार करतो पण सगळे पैलवान तुम्हाला सोडून का चाललेत? कोणी तुमच्यासोबत राहायला तयार नाही. या वयातही तुम्हाला महाराष्ट्रभर फिरावं लागतंय मग कसले पैलवान तुम्ही तयार केलेत अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणी राहायला तयार नाही, शरद पवारांची अवस्था शोल सिनेमातील जेलरसारखी झाली आहे. अर्धे इथे जा, अर्धे तिथे जा बाकीचे मागे या, पण मागे कोणी उरलेच नाही. तुमचे पैलवान दिसत नाही. गेल्या निवडणुकीत ४१ निवडून आले या निवडणुकीत २० आकडाही पार करु शकणार नाही असं त्यांनी सांगितले.
शरद पवार म्हणतात मी अनेक पैलवान तयार केलेत, मग तुमच्या सोबत एकही पैलवान का टिकत नाही?
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 18, 2019
- मा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न @Dev_Fadnavis@PawarSpeaks#MahaJanadeshSankalp Boripardhi, Tal. Daund, Pune#पुन्हा_आणूया_आपले_सरकार#PunhaAnuyaAapleSarkarpic.twitter.com/BTf2nJ6TUu
तसेच लोकसभेनंतर नॅनो पार्टी बनेल असं सांगितलं होतं ती कसर थोडी कमी झाली. आता यावेळेस ती कसर पूर्ण करणार आहोत. एका नॅनो गाडीत मावतील एवढेच लोक राष्ट्रवादीचे निवडून येणार आहे. अशाप्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस ही नॅनो पार्टी बनणार आहे अशी खिल्ली मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उडविली आहे.
एका नॅनो गाडीत मावतील एवढेच लोक राष्ट्रवादीचे निवडून आलेत, म्हणून राष्ट्रवादी ही नॅनो पार्टी!
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 18, 2019
- मा मुख्यमंत्र्यांनी उडवली खिल्ली@Dev_Fadnavis@PawarSpeaks#MahaJanadeshSankalp Malegaon, Baramati, Pune#पुन्हा_आणूया_आपले_सरकार#PunhaAnuyaAapleSarkarpic.twitter.com/XSwHyJyirM
राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाला जे कागदपत्रे उपलब्ध आहेत हे कागदपत्रे पाहिली की लक्षात येईल यातला माल वाटेल तसा लुटण्याचं काम केलं. शेतकरी, गरीब माणसांचे कारखाने जाणीवपूर्वक हे कारखाने तोट्यात आणायचे, त्यावर प्रशासक बसवायचे, त्यानंतर विक्रीला काढायचे, त्यानंतर बोली लावून कारखाने विकत घ्यायचे असं काम शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतले, ईडीने गुन्हा दाखल झाला. अजित पवारांनी राजीनामा दिला, आम्हाला वाटलं पश्चाताप झाला, सन्यास घेणार, सकाळी राजीनामा दिला, संध्याकाळी राजीनामा संपला, दुसऱ्या दिवशी पवारांकडे गेले अन् पुन्हा निवडणुकीला लागले अशा लोकांना तुम्हाला घरी बसवावे लागेल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
मा. मुख्यमंत्र्यांनी उघड केला, गरीब जनतेच्या सहकार्याने चालवलेल्या कारखाने लुटण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन!#MahaJanadeshSankalp Malegaon, Baramati, Pune#पुन्हा_आणूया_आपले_सरकार#PunhaAnuyaAapleSarkarpic.twitter.com/eOo0tzRJON
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 18, 2019