Maharashtra Election 2019 : संवेदनशील मनाचा नेता; देवेंद्र फडणवीसांची सह्रदयता दाखवणारे निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 03:17 PM2019-10-13T15:17:17+5:302019-10-13T15:18:59+5:30
राज्यात असे हजारो-लाखो लोक आहेत ज्यांचा उपचाराअभावी मृत्यू होतो ही सल देवेंद्र यांच्या मनात तेव्हापासूनच होती.ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पाच वर्षे आरोग्यसेवेचा अखंड यज्ञ चालविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस हे जनसंघ आणि भाजपाचे एक दिग्गज नेते होते.निष्काम कर्मयोगी अशी त्यांची ख्याती होती. संपूर्ण राजकीय जीवनामध्ये कुठल्याही आमिषाला बळी न पडता अविरत जनसेवेचे व्रत त्यांनी घेतले होते. गंगाधरराव हे विश्वासार्हतेचे दुसरे नाव. नागपूरच्या राजकारणात त्यांचा प्रचंड दरारा आणि सन्मान होता. ते नगरसेवक,उपमहापौर आणि विधान परिषदेचे सदस्यही राहिले. 1978 पुलोद सरकार स्थापन झाले तेव्हा गंगाधरराव यांना मंत्रीपद देऊ करण्यात आले पण त्यांनी नम्रपणे नकार दिला. माझ्यापेक्षा अकोल्यातील जनसंघाच्या नेत्या डॉ.प्रमिलाताई टोपले सिनियर आहेत त्यांना संधी द्या असे ते म्हणाले आणि प्रमिलाताई मंत्री झाल्या. गंगाधररावांचे कर्करोगाने अकाली निधन झाले.देवेंद्र तेव्हा विद्यार्थीदशेत होते. आपल्या वडिलांना ते आमदार होते म्हणून कर्करोगावर मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेता आले पण राज्यात असे हजारो-लाखो लोक आहेत ज्यांचा उपचाराअभावी मृत्यू होतो ही सल देवेंद्र यांच्या मनात तेव्हापासूनच होती.ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी पाच वर्षे आरोग्यसेवेचा अखंड यज्ञ चालविला.
महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कार्यालयामध्ये मुख्यमंत्री आरोग्य सहायता कक्ष स्थापन करणारे फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री. गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री सहायता निधी आणि मुख्यमंत्री आरोग्य निधीच्या माध्यमातून गोरगरीब लोकांना आणि रुग्णांना तब्बल पंधराशे कोटी रुपयांची मदत करण्यात आली 20 लाख लोकांना त्याचा लाभ झाला फडणवीस यांच्या आधी झालेल्या तीन-चार मुख्यमंत्र्यांनी मिळूनही ही मदत पाच पटीने अधिक आहे महाराष्ट्रातील हजारो वारकरी दरवर्षी आषाढी च्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या पंढरपुरातील विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी जातात हजारोंच्या दिंड्या भक्तिभावाने निघतात त्यावेळी सगळीकडे पाऊस असतो दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने प्लास्टिक बंदी केली त्यामुळे वारकऱ्यांना मोठाच प्रश्न पडला की आता पावसापासून बचाव करण्याकरता प्लास्टिक कापडाचा वापर करता येणार नाही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ निर्णय घेतला आणि त्या वर्षीची त्या वर्षीच्या कुठल्याही वारीला प्लास्टिक बंदी लागू नसेल असा निर्णय दिला पुन्हा यावर्षी तो प्रश्न उपस्थित झाला.वारकऱ्यांना रेनकोट देता येणार नाहीत का असा विचार मुख्यमंत्र्यांच्या मनात आला. कार्यवाहीची चक्रे गतीने फिरली आणि महाराष्ट्रातील तब्बल पाच लाख वारकऱ्यांना रेनकोट देण्यात आले. त्या रेनकोटवर मुख्यमंत्र्यांचे फोटो नव्हते.नावदेखील नव्हते.केवळ निर्मल वारी एवढेच लिहिले होते.एका सहृदय मुख्यमंत्र्याने निर्मळ मनाने केलेली ती सेवा होती.
अमृता करवंदे नावाची एक चुणचुणीत तरुणी एक दिवस मुख्यमंत्री कार्यालयात पत्र घेऊन आली त्या पत्रात तिने सवाल केला होता,मुख्यमंत्री महोदय, माझी जात कोणती? अमृता अनाथ आहे.त्यामुळे तिला जात नाही. मात्र आरक्षणाची आवश्यकता असलेल्या कुठल्याही समाज घटकापेक्षा किंबहुना तेवढीच मलादेखील आरक्षणाची आवश्यकता आहे असे तिने त्या पत्रात नमूद केले होते. मुख्यमंत्री महोदय! आमची संख्या मोठी नाही,आम्ही लाखोंचे मोर्चे काढू शकत नाही पण म्हणून आमची समस्या छोटी होत नाही अशी सल तिने त्या पत्रात व्यक्त केली होती.
पर्सन टू पर्सन आणि हार्ट टू हार्ट संपर्क ठेवण्याचा स्वभाव असलेल्या मुख्यमंत्र्यांचे संवेदनशील मन त्या पत्रामुळे अस्वस्थ झाले. त्यानंतर दहाच दिवसात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनाथ मुलामुलींना शासकीय नोकऱ्यांमध्ये एक टक्का समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला.