महाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला?; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 01:21 PM2019-10-22T13:21:40+5:302019-10-22T13:36:37+5:30

कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

Maharashtra Election 2019: EVM Hacked in Satara? vote gone bjp instead of NCP; Find out exactly what happened | महाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला?; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं!

महाराष्ट्र निवडणूक २०१९: घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला?; जाणून घ्या, साताऱ्यात नेमकं काय झालं!

googlenewsNext

मुंबई/सातारा : लोकसभा निवडणुकीपासून विरोधी पक्षांकडून ईव्हीएमवर संशय घेण्यात येत आहे. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी एकाचवेळी मतदान घेण्यात आले. काल विधानसभेसाठी राज्यभरात मतदान पार पडले. मात्र, सातारा जिल्ह्यातील नवलेवाडीमध्ये ईव्हीएममध्ये घोळ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मॉक ड्रीलवेळी ईव्हीएम चांगले होते. मात्र, सकाळी 10-11 वाजण्याच्या सुमारास ईव्हीएममध्ये घडाळ्याचे बटन दाबले असता कमळाचे म्हणजेच भाजपाच्या उमेदवाराला मत जात असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र, यामागची माहिती जाणून घेतली असता खरे सत्य समोर आले.


सकाळी 10 च्या सुमारास या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला. यामुळे मतदान करताना एरर दाखवू लागले. वरचे किंवा खालच्या बाजुचे कुठलेही बटन दाबले जात असता ते दाबलेच जात नव्हते. याबाबतची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकाराची माहिती राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना लागली. ईव्हीएममध्ये बिघाड की कमळाला मतदान होते याची चाचपणीही त्यांनी केली आणि खरा प्रकार समोर आला.


योगायोगाने शिंदे यांच्या मुलाच्या कारचा चालक नवलेवाडीचा रहिवासी होता. यामुळे शिंदे यांच्या मुलाने मतदान केंद्रावर जाऊन मशीनची पाहणी केली. यावेळी कोणतेच बटन दाबले जात नसल्याचे दिसून आले. शेवटी हे मशीन त्यांच्यासमोरच रिस्टार्ट करण्यात आले आणि मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. यामुळे या मशीनच्या बिघाडाची किंवा तक्रारीची कोणतीच नोंद झाली नाही. मात्र, सकाळपर्यंत घड्याळाचं बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची अफवा राज्यभरात पसरली होती. 
 

Web Title: Maharashtra Election 2019: EVM Hacked in Satara? vote gone bjp instead of NCP; Find out exactly what happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.