Maharashtra Election 2019: स्वत:ला फाटकं समजणारे पडळकर जवळपास करोडपती, जाणून घ्या संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 11:29 AM2019-10-07T11:29:37+5:302019-10-07T11:36:49+5:30
Maharashtra Election 2019: गोपीचंद पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातू आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे
सांगली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचिला रामराम करत जयश्रीराम म्हटले आहे. गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे पडळकर यांना भाजपानेबारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे, माझ्यावर कार्यकर्तेच प्रेम करतात, मला कार्यकर्तेच निवडणुकांसाठी पैसा पुरतवात. मी फाटकाच आहे, मला 1 दोन लाख रुपयांचं कर्ज आहे, असेही पडळकर जाहीरपणे सांगतात.
गोपीचंद पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातू आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत त्यांनी आपल्या संपत्तीचे विवरण असलेलं शपथपत्रही जोडले आहे. या शपथपत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा लेखोजोखा मांडण्यात आला आहे. त्यानुसार पडळकर यांच्याकडे जवळपास कोटी रुपयांची संपत्ती आहे. आपल्या 13 पानी शपथपत्रात पडळकर यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे. त्यानुसार, पडळकर यांच्याकडे रोख स्वरुपात 95 हजार रुपयांची रक्कम आहे.
जंगम मालमत्ता
पडळकर यांची एकूण जंगम मालमत्ता 26 लाख 682 रुपये एवढी आहे. त्यामध्ये 24 लाख रुपयांच्या फॉर्च्युनर गाडीचा समावेश आहे. तसेच, 20 ग्रॅम सोनं, रोख रक्कम, आणि बँकेतील ठेवींचाही समावेश आहे.
स्थावर मालमत्ता
पडळकर यांची स्थावर मालमत्ता 50 लाखांच्यावर आहे. आटपाडीतील पिंपरी या गावी त्यांची वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे. तसेच इतर जागा आणि जमीन मिळून स्थावर मालमत्ता 73 लाख रुपयांची आहे. त्यामध्ये 2013 साली गोपीचंद यांनी खरे 6994 चौरसफुट जागा खेरदी केली असून त्याचे सध्या बाजारमूल्य 28 लाख रुपये आहे. पडळकर यांची स्थावर आणि जंगम अशी एकूण संपत्ती 99 लाख 682 रुपये एवढी आहे. त्यामुळे स्वत:ला नेहमीच माझं सगळं उघडंय, माझ्याजवळ पैसाच नाही, असे म्हणणारे पडळकर जवळपास करोडपती आहेत, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही.