Maharashtra Election 2019: 'राजीनामे घेऊन फिरणारा ढाण्या वाघही भाजपाच्या अजगराला घाबरला'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 06:39 PM2019-10-13T18:39:01+5:302019-10-13T18:39:09+5:30

Maharashtra Election 2019: भाजपाच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना धावायला लावतात.

Maharashtra Election 2019: NCP MP Amol Kolhe Slams Shiv Sena | Maharashtra Election 2019: 'राजीनामे घेऊन फिरणारा ढाण्या वाघही भाजपाच्या अजगराला घाबरला'

Maharashtra Election 2019: 'राजीनामे घेऊन फिरणारा ढाण्या वाघही भाजपाच्या अजगराला घाबरला'

Next

मुंबई: भाजपाच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना धावायला लावतात. त्यामुळे पोलिसांच्या मनात देखील विचार येत असतील की तुम्ही सत्तेतून खाली उतरा मग तुम्हाला देखील आमची खाकी वर्दी दाखवतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपाच्या महाजनादेश यात्रेवर निशाणा साधला आहे.  तासगावच्या कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात ते बोलत होते. 

अमोल कोल्हे म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात अनेक लोकांना रोजगार गमवावे लागले. तसेच 27 हजारांची मेगाभरती करणार होते. मात्र ही पक्षाची मेगाभरती महिनाभर सुरु केल्याचे सांगत भाजपावर टीका केली आहे. त्याचप्रमाणे आर. आर. पाटील जेव्हा गृहमंत्री असतानाच्या काळात ५ वर्षात 65 हजारांची पोलिस भरती होती. राज्य सरकार 3000 हजार लोकांची पोलिस भरती करणार होते. परंतु ती देखील झाली नसल्याचे अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले. 

भारतीय जनता पार्टी नावाचा एक भला मोठा अजगर सुटला होता. अजगर जो दिसेल त्याला सीबीआय, ईडीची भीती दाखवून  फुत्कार टाकायचा. त्यानंतर अनेकजण सीबीआय, ईडी चैकशीच्या भीतीने स्वत:चं अजगरच्या पोटात जाण्याचा निर्णय घेतला. तसेच राजीनामा घेऊन फिरणारा ढाण्या वाघ देखील अजगरच्या पोटात गेला असल्याचं सांगत शिवसेनेवर देखील यावेळी टोला लगवाला. तसेच काही दिवसांनंतर अजगरला एक वयस्कर व थकलेला व्यक्ती दिसला. अजगरने पुन्हा फुत्कार सोडत ईडीची भीती दाखवली. मात्र यानंतर अजरगचं गहिवरला कारण तो 79 वयाचा तरुण होता आणि त्याचं नाव शरद पवार होतं असं सांगत शरद पवारांना ईडीच्या नोटीसवर टीका केली आहे.  

Web Title: Maharashtra Election 2019: NCP MP Amol Kolhe Slams Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.