Maharashtra Election 2019: भाजपा सरकारने ५ वर्षांत राज्यावर ४ लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:56 PM2019-10-10T16:56:11+5:302019-10-10T17:21:30+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election : भाजपा सरकारने राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम केलं असून त्यांच्या हातून आता सत्ता काढून घेण्याचे काम निवडणुकीत करायचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

Maharashtra Election 2019: NCP Sharad Pawar Slams BJP Goverment Of Maharashtra | Maharashtra Election 2019: भाजपा सरकारने ५ वर्षांत राज्यावर ४ लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे: शरद पवार

Maharashtra Election 2019: भाजपा सरकारने ५ वर्षांत राज्यावर ४ लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे: शरद पवार

Next

भाजपा सरकारने राज्याचे वातावरण बिघडवण्याचे काम केलं असून त्यांच्या हातून आता सत्ता काढून घेण्याचे काम निवडणुकीत करायचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. एकेकाळी आपल्या राज्याची ओळख धनिक राज्य अशी होती. मात्र गेल्या 5 वर्षात भाजपा सरकारने राज्यावर 4 लाख कोटींचे कर्ज करुन ठेवले असल्याचा आरोप देखील त्यांनी सरकारवर केला आहे. शरद पवारांनीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धामधील हिंगणघाटमधील सभेत आज (गुरुवारी) उपस्थितांना संबोधित केले.

राज्यात कुठल्याही रस्त्याने गेलात तर खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. आम्ही आघाडीच्या काळात खड्डे’मुक्त’ राज्य घडवण्याचा संकल्प केला होता, मात्र या सरकारने खड्डे’युक्त’ राज्य घडवण्याचा निर्धार केलाय. अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. पण सरकारला लोकांच्या जीवाची पर्वा नसल्याचे देखील शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यात कांद्याला चांगला भाव मिळत असताना या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली आणि परदेशी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच शेतकरी उध्वस्त झाला आहे. तसेच आजचे सत्ताधारी विरोधी बाकावर असताना कपाशीला ७ हजार भाव देण्याची मागणी करत होते. पण सत्तेत आल्यावर यांनी पाच वर्षांत कपाशीला एकदाही ७ हजाराचा भाव दिला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या भागात अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांनी पीकविमा काढून देखील त्यांना पैसे मिळाले नाहीत. सरसकट कर्जमाफीची घोषणा यांनी केली पण अजूनदेखील ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नसल्याचा आरोप देखील शरद पवारांनी भाजपा सरकारवर केला आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: NCP Sharad Pawar Slams BJP Goverment Of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.