Maharashtra Election 2019: शेती, रोजगार, अर्थव्यवस्था कितीही 'आजारी' असूदे;सर्व आजरांवर रामबाण उपाय कलम 370
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 07:41 PM2019-10-09T19:41:52+5:302019-10-09T19:42:09+5:30
भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बीडमध्ये झालेल्या प्रचारसभेत कलम 370चा मुद्दा उपस्थित करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता.
मुंबई: महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणुक राज्यामधील स्थानिक प्रश्नापेक्षा काश्मीरचा मुद्यावर लढवणार असल्याचे संकेत भाजपाकडून देण्यात आले आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बीडमध्ये झालेल्या प्रचारसभेत कलम 370चा मुद्दा उपस्थित करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. मात्र भाजपाच्या या धोरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व उपायांवर रामबाण उपाय असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने कार्टूनद्वारे भाजपावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. यामध्ये आजारी शेती, आजारी उद्योग, आजारी आरोग्यव्यवस्था, आजारी रोजगार कितीही असूदे आमच्याकडे या सर्व आजारांवर रामबाण उपाय कलम 370 असल्याचे दाखवण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही ३०० खासदारांचं बळ दिलं. त्यानंतर अवघ्या ५ महिन्यांत काश्मीरमधील कलम ३७० हटवलं, असं म्हणत भाजपा अध्यक्ष अमित शहां यांनी बीडमधून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. पंतप्रधान मोदी गेल्या ७० वर्षांपासून प्रलंबित असलेली अनेक कामं मार्गी लावत असल्याचे देखील अमित शहांनी यावेळी बोलताना सांगितले होते.
शेती, रोजगार, अर्थव्यवस्था कितीही 'आजारी' असूदे, आमच्याकडे सगळ्यावर कलम ३७०चा 'अक्सीर' इलाज आहे.@AmitShah@Pankajamunde@ChDadaPatil@BJP4Maharashtra@BJP4India#AssemblyElections2019#Article370pic.twitter.com/alz5wfp6hm
— NCP (@NCPspeaks) October 9, 2019
शरद पवारांनी याआधी सीमेवर पुलवामा हल्ला झाला, त्यानंतर भाजपाला त्याचा लाभ मिळाला म्हणूनच भाजपाने लोकसभा निवडणूक जिंकली. तसंच पुन्हा पुलवामासारखं काही घडलं नाही तर राज्यात सत्ता परिवर्तन नक्की आहे', असे वक्तव्य देखील शरद पवारांनी केले होते.