Maharashtra Election 2019 :  धनंजय मुंडेंच्या खोटेपणाचा कंटाळा आला, पंकजा मुंडेंचा उद्वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 10:00 PM2019-10-20T22:00:34+5:302019-10-20T22:01:15+5:30

विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी अवघे काही तास उरल्याने प्रमुख उमेदवार व त्यांच्या समर्थकांची ‘लगीन घाई’सुरु असून वैयक्तिक भेटीगाठी युद्ध पातळीवर सुरु आहेत.

Maharashtra Election 2019 : Pankaja Munde attack on Dhananjay Munde | Maharashtra Election 2019 :  धनंजय मुंडेंच्या खोटेपणाचा कंटाळा आला, पंकजा मुंडेंचा उद्वेग

Maharashtra Election 2019 :  धनंजय मुंडेंच्या खोटेपणाचा कंटाळा आला, पंकजा मुंडेंचा उद्वेग

Next

मुंबई - परळी विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे आणि त्यांचे भाऊ धनंजय मुंडे यांच्यात सुरू असलेले भावनिक राजकारण मतदानाच्या पूर्वसंध्येला शिगेला पोहोचले आहे. रविवारी संध्याकाळी पंकजा मुंडे यांनी गोपिनाथगड येथे जाऊन गोपिनाथ मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर टीका केली. तसेच धनंजय मुंडेंच्या खोटेपणाचा कंटाळा आला, अशा उद्वेग पंकजा मुंडेंनी व्यक्त केला. तसेच सध्या विकृत राजकारण पाहायला मिळतंय. ही घटना माझ्या जीवनातील सर्वात वाईट घटना आहे, असे उदगार पंकजा मुंडे यांनी काढले. 

दरम्यान, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरुन खासदार प्रितम मुंडेंनी खेद निराशा व्यक्त केली होती. आम्ही खिन्न झालो आहोत, आता सगळं सहन करण्यापलीकडे गेलंय. सगळ्या गोष्टी राजकारणाच्या नसतात, आता धनंजयचे बोलणे ऐकवत नाही. गलिच्छ आणि घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आला आहे. तुमचे-आमचं नातें निवडणुकीपुरते नाही, असे सांगताना खासदार प्रितम मुंडे यांनाही भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. गोपीनाथ मुंडे असते तर, असे बोलण्याची कुणाची हिंमत झाली नसती. रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल, असे म्हणत प्रितम मुंडेंनी धनंजय मुंडेंबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेक दु:खे आली, पण खंबीरपणे पंकजाताई सामोऱ्या गेल्या. त्या कधीही खचल्या नाही, काहीही केले तरी त्या खचत नाहीत हीच त्यांची पोटदुखी आहे. एवढ्या खालच्या पातळीवरील टीका ऐकूनही त्या खचल्या नाहीत. मात्र, त्या उद्विग्न झाल्या आहेत. यापूर्वी मी त्यांना एवढे उद्विग्न झाल्याचे कधीही पाहिलेलं नाही, असेही प्रितम मुंडेंनी म्हटलंय. 

दरम्यान, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन ते चुकीची व्हिडीओ क्लिप बनविण्यात आल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. धनंजय मुंडेंनी पंकजा यांच्यावर टीका करताना, आमच्या दोघात केवळ हाच फरक असल्याचं सांगत त्यांना टार्गेट केलं होतं. मी पंडित आण्णांच्या घरात जन्माला आलो आणि त्या गापीनाथ मुंडेंच्या घरात जन्माला आल्या. त्या मोठ्याच्या पोटी जन्माला आल्या, असे म्हणत धनंजय यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली होती. ''मला सहा बहिणी आहेत, मलाही तीन मुली आहेत. बहिण-भावाच्या नात्याला ज्यांनी डाग लावायचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. नव्याने आलेले लोकच बहिण-भावाच्या नात्यामध्ये विष कालवायचा प्रयत्न करत आहेत. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत मीही फिर्याद दाखल केली, पण पोलिसांनी माझी फिर्याद घेतली नाही. काहींना तर वाटतंय मी पृथ्वीतलावरच नसलो पाहिजे, हे मला खूप वेदनादायी आहे'', असेही धनंजय यांनी म्हटले  होते.  

Web Title: Maharashtra Election 2019 : Pankaja Munde attack on Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.