Maharashtra Election 2019 Video : 'पवारांना प्रसिद्धीचा हव्यास', व्हायरल व्हिडीओवरुन मोदींची कोपरखळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:44 PM2019-10-13T17:44:19+5:302019-10-13T17:47:23+5:30

Maharashtra Election 2019: यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जळगावात अभूतपूर्व सभा झाली.

Maharashtra Election 2019: 'Sharad Pawar wants publicity', Modi's cornerstone over viral video in election rally | Maharashtra Election 2019 Video : 'पवारांना प्रसिद्धीचा हव्यास', व्हायरल व्हिडीओवरुन मोदींची कोपरखळी

Maharashtra Election 2019 Video : 'पवारांना प्रसिद्धीचा हव्यास', व्हायरल व्हिडीओवरुन मोदींची कोपरखळी

Next

मुंबई - जम्मू काश्मीरमधील लोकांच्या विरुद्धची भावना काँग्रेस-राष्ट्रवादीची दिसून येते. शेजारील राष्ट्रांना मदत होईल असे वक्तव्य करतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्याच भाषणात शरद पवार यांना लक्ष्य केलं. तसेच, तुमच्यात हिंमत असेल तर आगामी निवडणुकीत विरोधकांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 परत आणू असं घोषणापत्रात देणार का? उगाच खोटे अश्रू काढू नका असं आव्हान मोदींनी विरोधकांना दिलं. त्यानंतर, मोदींनी पवारांच्या व्हायरल व्हिडीओवरुनही त्यांना कोपरखळी मारली. 

शरद पवार हे, एवढे मोठे नेते, ज्यांचे आयुष्यभर पेपरात फोटो छापले आहेत. टीव्हीवर ते सारखं दिसले आहेत. मोठा मान-सन्मान आहे. पण, एका व्यासपीठावर कार्यकर्त्यांकडून पुष्पहार परिधान करताना, पवारांनी चक्क कोपऱ्यानं युवकाला दाबलं, असे म्हणत मोदींनी अॅक्शन करुन दाखवली. मोदींनी पवारांना कोपरखळी मारली. यावरुन भाजपानेही पवारांना टार्गेट केलं. पवारांना प्रसिद्धीचा हव्यास असल्याचं भाजपाने म्हटलं आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. पवारांच्या या दौऱ्यात एका अतिउत्साही कार्यकर्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर येथील वडेगाव येथे शरद पवार प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी, मध्ये-मध्ये लुडबूड करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्याला पवारांनी अलगदपणे बाजुला सारले. या व्हिडीओवरुन मोदींना पवारांची नक्कल करुन दाखवली.   

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जळगावात अभूतपूर्व सभा झाली. पुढील 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार यावं यासाठी मी जळगावात आलो आहे. तुम्ही जो विश्वास भाजपावर, एनडीएवर दाखविला त्याचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे. चार महिन्यांपूर्वी तुम्ही समर्थ, सशक्त भारताच्या निर्माणासाठी मतदान केलं होतं. जगात भारताला स्थान मिळावं यासाठी तुम्ही मतदान केलं. नव्या भारताचा नवा जोश जगाला दिसू लागला आहे. तुम्हाला हे दिसतंय ना, असं जनतेला विचारले. पूर्वी असं चित्र पाहायला मिळालं होतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना विचारला. केवळ मोदी मूळे हे होत नाही, 130 कोटी भारतीय जनतेने केलेल्या सहकार्यामुळे शक्य झाले.

गेली 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांनी स्थिर सरकार दिलं. इतक्या वर्षांमध्ये फक्त एकाच मुख्यमंत्र्यांना सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहता आलं. त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला, महाराष्ट्रात 5 वर्ष भ्रष्टाचार दिसला नाही, रस्त्यांपासून सिंचनापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत सगळ्यांना न्याय दिला असं सांगत नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले
 

Web Title: Maharashtra Election 2019: 'Sharad Pawar wants publicity', Modi's cornerstone over viral video in election rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.