भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा खल; पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळीच सल?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 07:35 PM2019-11-01T19:35:31+5:302019-11-01T19:38:01+5:30
पाच वर्षं सत्तेत असताना एकमेकांशी भांडणारे 'भाऊ' आता सत्तास्थापनेवरून भांडत आहेत; एकमेकांवर कुरघोडीसाठी झगडत आहेत.
मुंबईः अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद हवंच, या शिवसेनेच्या आग्रही मागणीवर, मुख्यमंत्रिपद सोडून बोला, असा पवित्रा भाजपानं घेतल्यामुळे निकालाला आठवडा लोटूनही महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा मुहूर्तच ठरत नाहीए. पाच वर्षं सत्तेत असताना एकमेकांशी भांडणारे 'भाऊ' आता सत्तास्थापनेवरून भांडत आहेत; एकमेकांवर कुरघोडीसाठी झगडत आहेत. मुख्यमंत्रिपद हा त्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. पण, या खुर्चीभोवती सगळं राजकारण फिरत असताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मनात एक वेगळीच खंत, दुःख असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून कळतंय. अर्थात, ही सल मुख्यमंत्रिपदाशी संबंधितच आहे.
भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी'
'शिवसेना अडून राहिली तरच मुख्यमंत्रिपद मिळेल'
शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घातल्याचं कुणी समजू नये, असा इशाराच त्यांनी दिला. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचं काहीही ठरलेलं नाही, असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. ते शिवसेनेला चांगलंच खटकलंय. त्यावरूनच त्यांच्यातील चर्चेला खीळ बसल्याचं सांगितलं जातंय. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह १६ मंत्रिपदं द्यायची तयारी भाजपानं दाखवलीय. उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेनं कुणालाही द्यावं, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आदित्य ठाकरेंचं नावंही सुचवलंय. त्यावर शिवसेना तडजोड करेल की नाही, माहीत नाही; पण गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाली असली तरी आदित्य ठाकरेंचं नाव मोठ्या पदासाठी चर्चेत आहे. इथेच थोडी गडबड झालीय म्हणे!
शिवसेनेला 'टाळी' देऊ पाहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना निरुपम यांचा 'टाळ्यां'चा सल्ला
भाजपानं उपसलं शेवटचं अस्त्र; शिवसेनेला थंड करण्यासाठी 'सर्वोच्च' इशारा
'मुख्यमंत्री आदित्य ठाकरे' अशा आशयाची होर्डिंग मुंबईत अनेक ठिकाणी लागली. आता उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा होतेय तेव्हाही आदित्य ठाकरे यांचंच नाव घेतलं जातंय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं नाव आपोआपच मागे पडलंय. खरं तर, मुख्यमंत्रिपदासाठी सगळ्यात आधी आपलं नाव येईल, असं आतून कुठेतरी उद्धव ठाकरेंना वाटत असणारच. पण शिवसेना नेत्यांपैकी कुणीच तशी भूमिका घेताना दिसत नाहीए. बरं, मुलाचं - आदित्यचंच नाव पुढे आल्यानं नाराजी तरी कशी व्यक्त करायची, अशा द्विधा मनःस्थितीत ते असल्याचं त्यांच्या जवळचे लोक सांगतात.
शिवसेनेला काँग्रेस- राष्ट्रवादी पाठिंबा देणार?; शरद पवार म्हणतात...
भाजपाची आणखी एक खेळी; शिवसेनेला शह देण्यासाठी दोन उपमुख्यमंत्री?
मागे एका पत्रकार परिषदेत, आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाबाबत उद्धव यांना विचारलं होतं तेव्हा, त्यांना आधी अनुभव घेऊ दे, असं सावध विधान त्यांनी केलं होतं. ते सूचकही होतं, हे कुणाच्याच लक्षात आलं नाही, असंच आता म्हणावं लागेल.