महाराष्ट्र निवडणूक 2019: 'अटल' शब्दात भाजपाला टोला; संजय राऊत पुन्हा बरसले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 08:26 AM2019-11-08T08:26:48+5:302019-11-08T08:43:50+5:30
शब्द वाजपेयींचे, टीका भाजपावर; संजय राऊत यांचा पुन्हा हल्लाबोल
मुंबई: निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून शिवसेना खासदार संजय राऊतभाजपावर दररोज हल्लाबोल करत आहेत. काल कवी दुष्यंत कुमार यांच्या शब्दातून भाजपावर निशाणा साधल्यानंतर आज राऊत यांनी भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या शब्दांत भाजपावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. विशेष म्हणजे काल झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी याबद्दलचे संकेत दिले होते.
'आग्नेय परीक्षा की इस घड़ी में- आइए, अर्जुन की तरह उद्घोष करें : ‘‘न दैन्यं न पलायनम्।’’, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. अटलबिहारी वाजपेयींनी हे वाक्य म्हटलं होतं, त्याची आठवण राऊत यांनी भाजपाला करुन दिली आहे. न दैन्यं न पलायनम् हा गीतेमधला संदेश असल्याचं राऊत यांनी ट्विटच्या शेवटी म्हटलं आहे. कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है, असा या संदेशाचा अर्थ होतो. राऊत गेल्या अनेक दिवसांपासून ट्विट करत भाजपावर अप्रत्यक्ष टीका करत आहेत.
आग्नेय परीक्षा की
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 8, 2019
इस घड़ी में-
आइए, अर्जुन की तरह
उद्घोष करें :
‘‘न दैन्यं न पलायनम्।’’
- अटल बिहारी वाजपेयी
(गीता का संदेश- *न दैन्यं न पलायनम्* अर्थात कोई दीनता नहीं चाहिए , चुनौतियों से भागना नहीं , बल्कि जूझना जरूरी है)
तत्पूर्वी काल संजय राऊत यांनी दुष्यंत कुमारांच्या शब्दांत भाजपावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला होता. तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं, कमाल है कि, फ़िर भी तुम्हें यक़ीन नहीं, या कवितेतून राऊत यांनी भाजपाला लक्ष्य केलं होतं. याबद्दल त्यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दुष्यंत कुमार, बशीर बद्र हे कवी मला आवडतात. अटलजींनी केलेलं लिखाणदेखील मला आवडतं. आता पुढे माझ्या ट्विटमध्ये अटलजीदेखील येतील, असं राऊत म्हणाले होते. यानंतर आज त्यांनी अटलजींचे शब्द ट्विट केले. त्यातून त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपावर हल्ला चढवला आहे.