उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बोलावली शिवसेना आमदारांची तातडीची बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 04:36 PM2019-11-06T16:36:13+5:302019-11-06T16:46:23+5:30

महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे.

Maharashtra Election 2019 : Uddhav Thackeray convened a meeting of Shiv Sena MLAs on Thursday | उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बोलावली शिवसेना आमदारांची तातडीची बैठक 

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी बोलावली शिवसेना आमदारांची तातडीची बैठक 

Next

मुंबई - महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत निर्माण झालेला पेच अद्यापही कायम आहे. शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम ठेवला आहे, तर काँग्रेसमधील एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहे. दुसरीकडे भाजपाने आता काहीशी नरमाईची भूमिका घेतली असली तरी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देण्यावर ते ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या मातोश्री निवासस्थानी ही बैठक होणार आहे. 

 गुरुवारी होणाऱ्या या बैठकीत राज्यामध्ये सध्या निर्माण झालेला सत्तावाटपाचा तिढा, भाजपासोबत वाटाघाटी करण्याबाबत आमदारांची भूमिका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्यास त्याचे स्थानिक राजकारणावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम, भाजपाबाबत शिवसेना आमदारांचे असलेले मत याबाबत चर्चा होणार आहे. 

दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेबाबतचा पेच अद्याप कायम असून, शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत घेतलेली ठाम भूमिका आणि भाजपाने त्यास दिलेला नकार यामुळे बहुमत मिळूनही युतीचे घोडे अडले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडूनही विरोधात बसायचे की शिवसेनेला पाठिंबा द्यायचा याबाबत परस्परविरोधी विधाने करण्यात येत असल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे. 

आता या सर्व घडामोडींदरम्यान,  काँग्रेस नेते हुसेन दलवाईंनी संजय राऊतांची भेट घेतली असून, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपावर निशाणा साधला.  कोणत्याही परिस्थितीत भाजपाचं सरकार अन् मुख्यमंत्री होऊ देणार नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू देणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधींनी मिळून यावर तोडगा काढावा. भाजपापेक्षा शिवसेना केव्हाही चांगलीच आहे. देवेंद्र फडणवीस यांना भागवतांचा सल्ला घ्यावा लागतो. भाजपाचं हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये बराच फरक आहे. आम्ही ईडीला घाबरत नाही, असं म्हणत त्यांनी भाजपावरही हल्लाबोल केला आहे.  

Web Title: Maharashtra Election 2019 : Uddhav Thackeray convened a meeting of Shiv Sena MLAs on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.