सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 08:04 PM2024-10-21T20:04:45+5:302024-10-21T20:07:43+5:30

लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Maharashtra Election 2024- After coming government will give two thousand rupees to Ladki Bahin; CM Eknath Shinde assurance | सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन

सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन

मुक्ताईनगर (जि.जळगाव) : मुख्यमंत्री - लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्यात सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजाराऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही त्यांनी जाहीर केले. 

मुक्ताईनगर येथे सोमवारी सायंकाळी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.  त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले की,  आचारसंहिता लागल्यानंतर लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बॅंक खात्यात जमा केले आहेत.  

सीएम नाही कॉमन मॅन
आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही तर कॉमन मॅन असल्याचे सांगताच मंडपात टाळ्यांचा कडकडाट झाला.

चंद्रकांत पाटील यांना  शिंदे सेनेतर्फे उमेदवारी 
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात शिंदे सेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीतर्फे त्यांची उमेदवारी जाहीर केली.

Web Title: Maharashtra Election 2024- After coming government will give two thousand rupees to Ladki Bahin; CM Eknath Shinde assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.