"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 12:35 PM2024-11-15T12:35:25+5:302024-11-15T12:40:00+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 : एआयएमआयएमचे प्रमुख असदुत्तीन ओवेसी यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात मोठे विधान केले आहे...
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. नेतेमंडळी मुलाखती आणि जाहीरसभा आदींतून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे वार पलटवार करताना दिसत आहेत. यातच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात मोठे विधान केले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका जनसभेला संबोधित करताना AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "आता आपम मुख्यमंत्री होणार नाही, हे एकनाथ शिंदे यांना माहीत झाले आहे. आता आपण येणार नाही, हे देवेंद्र फडणवीसांनाही माहीत झाले आहे. यामुळेच माझे नाव घेऊन हिन्दू-मुस्लीम करत आहेत. हे लोक हिन्दू-मुस्लीम करून समाजात फूट पाडत आहेत."
लाडकी बहीण योजनेवरही भाष्य -
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, "आता सीएम एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री अमित शाह म्हणत आहेत की, आम्ही लाडक्या बहिणींना 1500 रुपये देत आहोत. हा पैसा तुमचाच आहे. ते आपल्या खिशातून देत नाहीत. भाजपवाले म्हणाले होते, 15 लाख रुपये येतील पण केवळ 1500 रुपये येत आहेत."