Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 12:51 PM2024-10-30T12:51:25+5:302024-10-30T12:52:06+5:30

Suhas Kande Case: नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. 

Maharashtra Election 2024: Case filed against Shiv Sena candidate Suhas Kande in nandgaon | Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल

Suhas Kande News: छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंड करत नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात भुजबळ-कांदे संघर्ष वाढला आहे. सुहास कांदे यांनी भुजबळ समर्थक विनोद शेलार यांना शिवीगाळ केली. शेलार आणि पगार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कांदेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सुटला. या मतदारसंघासाठी छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ आधीपासूनच प्रयत्न करत होते. मात्र, शिवसेनेला जागा गेल्याने समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

कांदेंकडून शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल

सुहास कांदे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुहास कांदे हे समीर भुजबळ समर्थक विनोद शेलार आणि शेखर पगार यांना शिवीगाळ करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

शेलार-पगारांकडून तक्रार

विनोद शेलार आणि शेखर पगार यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात सुहास कांदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सुहास कांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. 

कांदे-भुजबळ संघर्ष वाढणार

भुजबळ आणि कांदे यांच्यात आधीपासूनच संघर्ष आहे. मात्र, तिन्ही पक्ष एकत्र आल्याने दोन्ही नेत्यांमधील संघर्ष थांबला होता. आता समीर भुजबळ यांनी नांदगावमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हा संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे.

काही दिवसांपूर्वी सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांना गद्दार म्हटले होते. सुहास कांदे हे मतदारसंघात दादागिरी करत असल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करताना केला होता. त्यामुळे मतदान होईपर्यंत या मतदारसंघातील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. 

Web Title: Maharashtra Election 2024: Case filed against Shiv Sena candidate Suhas Kande in nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.