"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:38 PM2024-11-07T12:38:07+5:302024-11-07T12:38:52+5:30
"तेत्रा युगात बजरंगबली होते, इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकी रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या या समरात नेते मंडळींमध्ये आरोप प्रत्यारोप आणि जबरदस्तत वाकयुद्ध सुरू असल्याचे दिसत आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे (BJP) फायरब्रँड नेते तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी अमरावतीमध्ये एका प्रचारसभेदरम्यान मोठे विधान केले आहे. 'तेत्रा युगात बजरंगबली होते, इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती,' असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ? -
आपल्या भाषणादरम्यान योगी आदित्यनाथ आपल्या पद्धतीने काही जुन्या घटनांची आठवण हिंदू मतदारांना करून देताना दिसत आहेत. हनुमान चालिसा आणि नवनित राणा, मुद्द्याचा उल्केख करत योगी म्हणाले, "जरा आठवा, जेव्हा बजरंग बली असतील, त्रेतायुगात, तेव्हा तर इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती. आज आम्ही हनुमान चालिसेचे पठण करत आहोत, राम नवमीची शोभा यात्रा काढत आहोत, तर तिला प्रतिबंध घातले जातात, ती आडवली जाते, कशामुळे? आणि ज्यांना बजरंगबली पसंत नाहीत, त्यांनी जे पसंत आहे, तेथे जावे. भारतात कोण असा भारतीय असेल, प्रभू रामचंद्रांना मानत नसेल, बजरंगबलींना मानत नसेल."
योगी पुढे म्हणाले, "बंधू आणि भगिनींनो मी येथे आपल्या सर्वांना हे सांगण्यासाठी आलो आहे की, निवडणूक राष्ट्र धर्माची निवडणूक आहे. आपले सर्व काही देशाच्या नावे असायला हवे. प्रत्येक काम देशाच्या नावे. आपले व्यक्तिगत कसलेही अस्तित्व नाही. आपले सर्व काही देशासाठी असायला हवे. जे देशाच्या हिताचे असेल, तेच आपल्या हिताचे आहे. जे शाच्या विरुद्ध आहेत, ते आपल्याही विरुद्ध आहे. याच संकल्पासह आपण महाराष्ट्राची निवडणूकही घ्याची आहे. जर देशाच्या हितात महायुतीचे सरकार येणार आहे, तर कुठल्याही परिस्थितीत येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत आणायचे आहे. हेच आवाहन करण्यासाठी मी येथे आलो आहे."