मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:19 AM2024-10-26T10:19:31+5:302024-10-26T10:20:27+5:30

Manoj Jarange Patil - Uday Samant : या भेटीबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Maharashtra Election 2024 : Manoj Jarange Patil - Uday Samant meet again! A discussion in political circles  | मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...

मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...

जालना : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत असून भेटीगाठी घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.अंतरवाली सराटीत उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, उदय सामंत यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीसाटी सर्व  पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर आम्ही निर्णय घेणार आणि उमेदवार जाहीर करणार, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते. तसेच, उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. यानंतर उदय सामंत यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे उदय सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, "मी माझ्या काही सहकाऱ्यांचे एबी फॉर्म पक्षामार्फत घेऊन आलो होतो. यादरम्यान, मी मनोज जरांगे पाटील यांना विचारलं, त्यांना वेळ आहे का, ते दिवसभर कामात व्यस्त असतात. काल मला समजलं आज ते कामातून थोडे मोकळे झाले आहेत, त्यामुळे एक मित्र म्हणून मी त्यांना भेटावं बोलावं या उद्देशाने आलो होतो. रात्री भेटलं तरी बातमी होते, उन्हात भेटलो तरी ब्रेकिंग होते. त्यामुळं करायचं काय हा देखील आमच्यासमोर प्रश्न आहे. आजची चर्चा राजकीय चर्चा नव्हती, मी आलो, त्यांना भेटलो, चर्चा झाली,  चहा घेतला आणि निघालो, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही."

याचबरोबर, मनोज जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या वक्तव्यावरही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहणं किंवा उभं करणं हा एक त्यातला प्रकार आहे.मनोज जरांगे यांना जो प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी जे आंदोलन केलं, त्याच्यावर जर ते उमेदवार उभे करणार असतील तर तो त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या सोबत असणाऱ्यांचा तो अधिकार आहे. त्यामध्ये मला हस्तक्षेप करायचा नाही. या दरम्यान एक मित्र म्हणून देखील चर्चा होऊ शकते, भेट होऊ शकते. या भेटीकडे आणि चर्चेकडे दोन मित्रांनी केलेली चर्चा म्हणूनच बघावं अशी माझी विनंती आहे." दुसरीकडे, उदय सामंत यांच्या भेटीबाबत मनोज जरांगे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी सामाजिक आणि राजकीय विषयावरती चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.

Web Title: Maharashtra Election 2024 : Manoj Jarange Patil - Uday Samant meet again! A discussion in political circles 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.