मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 10:09 PM2024-10-22T22:09:04+5:302024-10-22T22:49:02+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Election 2024 - MNS Second list of 45 Candidate released; Amit Thackeray will fight in Mahim constituency | मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?

मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर आजपासून राज्यात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. त्यात भाजपाने पुढाकार घेत ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली. या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. मात्र त्यातच राज ठाकरे यांच्या मनसेनं स्वबळावर राज्यात निवडणूक लढवण्याचं जाहीर केले होते. आज मनसेची ४५ जणांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अमित राज ठाकरे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

मनसेच्या पहिल्या यादीत कोणाला स्थान?

कल्याण ग्रामीण - राजू पाटील
माहिम - अमित राज ठाकरे
भांडूप पश्चिम - शिरीष सावंत
वरळी - संदीप देशपांडे
ठाणे शहर - अविनाश जाधव
मुरबाड - संगीता चेंदवणकर
कोथरुड - किशोर शिंदे
हडपसर - साईनाथ बाबर
खडकवासला - मयुरेश रमेश वांजळे
मागाठणे -नयन कदम
बोरिवली - कुणाल माईणकर
दहिसर - राजेश येरुणकर
दिंडोशी - भास्कर परब
वर्सोवा - संदेश देसाई
कांदिवली पूर्व - महेश फरकासे
गोरेगाव - विरेंद्र जाधव
चारकोप - दिनेश साळवी
जोगेश्वरी पूर्व - भालचंद्र अंबुरे
विक्रोळी - विश्वजित ढोलम
घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल
घाटकोपर पूर्व - संदीप कुलथे
चेंबूर - माऊली थोरवे
चांदिवली - महेंद्र भानुशाली
मानखुर्द शिवाजीनगर - जगदीश खांडेकर
ऐरोली - निलेश बाणखेले
बेलापूर - गजानन काळे
मुंब्रा कळवा - सुशांत सूर्यराव
नालासोपारा - विनोद मोरे
भिवंडी पश्चिम - मनोज गुळवी
मीरा भाईंदर - संदीप राणे
शहापूर - हरिश्चंद्र खांडवी
गुहागर - प्रमोद गांधी
कर्जत जामखेड - रविंद्र कोठारी
आष्टी - कैलास दरेकर
गेवराई - मयुरी बाळासाहेब म्हस्के
औसा - शिवकुमार नागराळे
जळगाव शहर - अनुज पाटील
वरोरा - प्रवीण सूर
सोलापूर दक्षिण - महादेव कोनगुरे
कागल - रोहन निर्मळ
तासगाव कवठे महांकाळ - वैभव कुलकर्णी
श्रीगोंदा - संजय शेळके
हिंगणा - विजयराम किनकर
नागपूर दक्षिण - आदित्य दुरुगकर
सोलापूर शहर उत्तर - परशुराम इंगळे

याआधीचे मनसेचे जाहीर झालेले उमेदवार

शिवडी - बाळा नांदगावकर
वणी - राजू उंबरकर
चंद्रपूर - मनदीप रोडे
राजुरा - सचिन भोयर
लातूर ग्रामीण - संतोष नागरगोजे
हिंगोली - प्रमोद कुटे
पंढरपूर - दिलीप धोत्रे
 

Web Title: Maharashtra Election 2024 - MNS Second list of 45 Candidate released; Amit Thackeray will fight in Mahim constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.