Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 05:40 AM2019-11-26T05:40:25+5:302019-11-26T05:41:47+5:30
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची रिकामीच राहिली.
मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खुर्ची रिकामीच राहिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केल्यानंतर शनिवारी भल्या पहाटे राज्यपाला भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट उठवत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. मात्र फडणवीस आणि पवारांनी लगेच कामकाज सुरू केले नव्हते.
सोमवारी, यशवंतराच चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी फडणवीस यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. तत्पूर्वी त्यांनी विधानभवनात यशवंतराच चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अजित पवारही उपस्थित होते. मात्र, पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार न स्विकारल्याने अनेक तर्वष्ठवितर्वष्ठ काढले जात आहेत.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना
५ हजार ३८० कोटींची मदत
मुंबई : मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी शेतकºयांना आर्थिक मदत देण्याबाबत चर्चा केली होती. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकºयांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना अधिकची मदत मिळावी, यावर या चर्चेत एकमत झाले होते. आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्य सचिव तसेच अर्थ सचिवांशी झालेल्या चर्चेअंती नुकसानग्रस्त शेतकºयांना आणखी ५ हजार ३८० कोटींची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निधीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने मंजुरी दिली.