अजित पवारांच्या बंडाशी संबंध नाही - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:43 AM2019-11-26T04:43:52+5:302019-11-26T04:44:32+5:30

‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडाशी माझा काहीही संबंध नाही.

Maharashtra Election, Maharashtra Government: No connection with Ajit Pawar's rebellion - Sharad Pawar | अजित पवारांच्या बंडाशी संबंध नाही - शरद पवार

अजित पवारांच्या बंडाशी संबंध नाही - शरद पवार

Next

क-हाड (जि.सातारा)  - ‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडाशी माझा काहीही संबंध नाही. त्यांना पक्षातून काढून टाकायचे की त्यांच्यावर कोणती अन्य कारवाई करायची, याचा निर्णय पक्षातील सर्वांच्या विचाराने घेतला जाईल,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

कºहाड येथे सोमवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी खा. पवार यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचेच सरकार अस्तित्वात येईल. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मात्र शिवसेना,राष्ट्रवादी व काँॅग्रेसचेच सरकार येईल. सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे आहे,’ असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

‘मुंबईतलं सगळं नीटनेटकं करतो’

‘तुम्ही उसाचं वजन कसं वाढंल, याची चर्चा करा. मुंबईत सध्या काय चाललंय, त्याची चर्चा करत बसू नका. मी ते सगळं नीटनेटकं करतो. त्याची काळजी करू नका,असे सांगत शरद पवार यांनी एकप्रकारे राज्यात आपलेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त केला. यशवंतनगर (ता. कºहाड) येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा गळीत हंगाम प्रारंभ शरद पवार यांच्या हस्ते सोमवारी पार पडला.
 

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: No connection with Ajit Pawar's rebellion - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.