Maharashtra Election Voting Live: पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये 56 टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 07:03 AM2019-04-11T07:03:55+5:302019-04-11T23:13:47+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2019 Live : मुंबई - लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे.

Maharashtra Election Voting Live: पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये 56 टक्के मतदान | Maharashtra Election Voting Live: पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये 56 टक्के मतदान

Maharashtra Election Voting Live: पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये 56 टक्के मतदान

Next

Maharashtra Election 2019 Live : मुंबई - लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी राज्यात आज विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान होत आहे. नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.

09:53 PM

नक्षलप्रभावित क्षेत्रातील चार मतदान केंद्रावर होऊ शकले नाही मतदान



 

08:32 PM

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात सात जागांसाठी 56 टक्के मतदान



 

08:25 PM

भंडारा: भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.८५ टक्के मतदान

भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.८५ टक्के मतदान. सरासरी ७० टक्के मतदानाचा अंदाज 

07:01 PM

रामटेक येथे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 52 टक्के मतदान

रामटेक  लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 52 टक्के मतदान झाले 

06:14 PM

वर्धा येथे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 55.38 टक्के मतदान

वर्धा लोकसभा मतदार संघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 55.38 टक्के मतदान झाले 

06:13 PM

यवतमाळ-वाशिममध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 53.40 टक्के मतदान झाले

06:12 PM

गडचिरोली-चिमूरमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 61 टक्के मतदान

गडचिरोली-चिमूरमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 61 टक्के मतदान झाले

06:11 PM

वर्धा लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 55. 38 टक्के मतदान

वर्धा लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 55. 38 टक्के मतदान झाले. रात्री आठ वाजेपर्यंत मतदान चालण्याची शक्यता असूून, अजूनही अनेक मतदान केंद्रांवर मतदार रांगा लावून आहेत

05:02 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे बजावला मतदानाचा हक्क

नागपूर येथील मतदान केंद्रात मतदान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

04:28 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे बजावला मतदानाचा हक्क

नागपूर येथील मतदान केंद्रात मतदान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

03:49 PM

मतदानकेंद्राला लग्नासारखी सजावट, बलून डेकोरेटेड

भंडारा : तालुक्याच्या विहीरगाव येथील सखी मतदान केंद्र. लग्नसोहळ्या सारखे सजविण्यात आले आहे. रांगोळी काढून आणि प्रवेशद्वारावर बलुन बांधण्यात आले आहे. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे.

03:44 PM

नागपूरमध्ये 3 वाजेपर्यंत 38 टक्के मतदान



 

03:43 PM

उन्हातही वाढतोय जोर, मतदारांचा उत्साह

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील कारंजा-मानोरा व वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ३६ .०३ टक्के मतदान झाले.

03:30 PM

भंडारा : साकोली तालुक्याच्या पससोडी येथे एका वृद्ध महिलेला असे उचलून मतदान केंद्रावर आणले.

भंडारा : साकोली तालुक्याच्या  पससोडी येथे एका वृद्ध महिलेला असे उचलून मतदान केंद्रावर आणले.

03:29 PM

लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डांनी बजावला मतदानाचा हक्क

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा आणि लोकमत मीडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी मतदानाचा हक्क बजावला. यवतमाळ येथील काटेबाई शाळा या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले.

03:15 PM

नागपूरमध्ये नितीन गडकरीच्या विरोध लढणाऱ्या नाना पटोलेंनी कुटुंंबासह केलं मतदान

03:10 PM

गडचिरोलीत मतदानावरुन परतताना ट्रॅक्टर ट्रॉलीला अपघात, 3 ठार 9 जखमी



 

02:48 PM

महसूल राज्यमंत्री श्री संजय राठोड यांनी दारव्हा येथे केलं मतदान

02:46 PM

यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघात खा. भावना गवळी यांनी केलं मतदान

02:09 PM

पहिल्यांदाच केलं मतदान, तरुणाईचा उत्साह

यवतमाळ : वयाची 18 वर्षे पूर्ण झाली। मतदार यादीत नाव नोंदविले। लोकसभेच्या निवडणुकीत पहिले मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले। यवतमाळ-वाशिम मतदार संघात बोरिअरब (ता.दारव्हा) येथे मतदान केल्याचे दाखविताना युवक।

 

01:05 PM

वैशालीताई येडे यांनी राजुर ता.कळंब येथे मतदानाचा हक्क बजावला

वाशिम-यवतमाळ मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेनच्या भावना गवळी यांच्याविरुद्ध त्या लढत आहेत. 

 

01:00 PM

देशात मजबूत सरकार यावं, यासाठी मतदान - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि आईंसह मतदानाचा हक्क बजावला. नागपुरातील धरमपेठ मतदान केंद्रावर मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मतदान केले. त्यावेळी बोलताना, देशात मजबुत सरकार यावं यासाठी मतदान करत असल्याचे ते म्हणाले. तसेच, सर्वांना जास्तीत-जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.  


 

12:15 PM

गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात मतदानावेळी भुरुंग स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही

कसनसून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना. नक्षलवाद्यांनीच हे कृत्य घडवून आणल्याचे समजते. कारण, नक्षलवाद्यांनी येथे मतदानावार बहिष्कार घालण्याची मागणी केली होती.



 

12:10 PM

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील 7 मतदारसंघांमध्ये 13.7 टक्के मतदान

ही मतदानाची टक्केवारी सकाळी 11 वाजेपर्यंतची आहे.



 

11:46 AM

यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावर यांनी पत्नी मिनालसह केले मतदान.

11:36 AM

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघाची सकाळी 11 पर्यंतची मतदानाची टक्केवारी 12.06 आहे.

पांढरकवडा (यवतमाळ) :  चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आर्णी/ केळापूर  विधानसभा क्षेत्रात मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे .सकाळी ९ वाजेपर्यंत ७% मतदान झाले .२३७५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातील राळेगाव येथे 102 वर्षीय भवरीलाल बोथरा यांनी 17 व्या लोकसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला। 1952 च्या पहिल्या लोकसभेचे ते साक्षीदार आहे। वयोवृद्ध मतदार असलेले भवरीलाल यांचा उपविभागीय अधिकारी स्नेहा उबाळे यांनी सत्कार केला। यावेळी तहसीलदार ए.एस. बक्षी आदी उपस्थित होते.

 

10:55 AM

अपंगासाठी नव्हती व्हीलचेअर, पत्रकारांच्या गोंधळानंतर सुटला प्रश्न

प्रशांत विद्यालय हिवरी नगर नागपूर येथील मतदारसंघात सुरुवातीला व्हील चेअर नसल्याचे उघड झाले. कारण, 4 अपंगांनी व्हील चेअरचा वापर न करताच मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत लोकमतच्या प्रतिनीधींनी आक्षेप घेऊन फोटो काढल्यानंतर निवडणूक अधिकारी खडबडून जागे झाले. त्यानतंर, एका कोपऱ्यात असलेली व्हील चेअर अपंग मतदारांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली. तसेच या कामासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी दोन स्वयंसेवकही नेमले. 


 

10:36 AM

105 वर्षांच्या आजीबाईंनी बजावला मतदानाचा हक्क

यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील लाडखेड केंद्रावर कौसल्याबई चिदुजी दुधे या 105 वर्षाच्या आजीने केले मतदान. 

10:35 AM

मतदानाची टक्केवारी, अपंग मुलीने व्हील चेअरवरुन येऊन केले मतदान

वर्धा लोकसभा मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सात 7.32 टक्के मतदान झाले आहे. तर, भंडारा - गोंदिया मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७ टक्के मतदान. चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी वणी विधानसभा क्षेत्रात मतदानाची प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ८.८३ टक्के  मतदान झाले. त्यात १७ हजार ६४० पुरुष तर ७ हजार २९७ अशा एकूण  २४ हजार ९३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदार संघाची सकाळी 9 पर्यंतची मतदानाची टक्केवारी 5.03 आहे.

10:29 AM

नितीन गडकरींनी बजावला मतदानाचा हक्क

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातील 220 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला



 

10:17 AM

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत केवळ 5 टक्के मतदान

मतदान केंद्रावर व्हील चेअर नसल्याने अपंग मतदाताने चक्क हातावर चालून मतदान केंद्र गाठले

09:42 AM

यवतमाळ : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दारव्हा तालुक्यातील हरू केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी दारव्हा तालुक्यातील हरू केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क.

09:19 AM

उंचीने जगातील सर्वात लहान असलेल्या महिलेचं मतदान, ज्योती अमगेंनी बजावला हक्क

ज्योती अमगेंनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. कितीही महत्त्वाच काम असू द्या, पण मतदान नक्की करा. आधी मतदान करा, मगच पुढं चाला, असा संदेश ज्योतीनं नागरिकांना दिला आहे. 



 

08:59 AM

यवतमाळ मतदान केंद्रावर पुष्पगुच्छ देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले

08:07 AM

मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, मतदान उशिराने सुरू

यवतमाळ : येथील दाते कॉलेज मतदान केंद्रावर EVM पाऊण तास विलंबाने सुरू, तांत्रिक बिघाड, मतदार रांगेत ताटकळत होते.

08:05 AM

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातही उत्साहात मतदानाला सुरुवात



 

07:22 AM

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी लवकरच ते मतदान केंद्रावर हजर झाले होते. नागपूर येथील मतदारसंघात मतदान केल्यानंतर त्यांनी मतदान केल्याची निशाणी दाखवत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले.

07:19 AM

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, सरसंघचालक मोहन भागवत मतदान केंद्रावर हजर

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, सरसंघचालक मोहन भागवत मतदान केंद्रावर हजर झाले असून मतदारांनी मतदानासाठी रांगेत उभा राहायला सुरुवात केली आहे.



 

Web Title: Maharashtra Election Voting Live: पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये 56 टक्के मतदान

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.