राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 10:09 PM2020-11-27T22:09:57+5:302020-11-27T22:10:48+5:30

Maharashtra: Existing lockdown restrictions extended till Dec 31: दिवाळीनंतर राज्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले होते.

Maharashtra: Existing lockdown restrictions extended till Dec 31 | राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय

राज्यातील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला, ठाकरे सरकारचा निर्णय

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. शुक्रवारी यासंदर्भातील आदेश राज्यातील ठाकरे सरकारने काढला आहे. राज्यातील कंन्टेन्मेंट झोनमध्ये म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात हा लॉकडाऊन असणार आहे. 

'मिशन बिगिन अगेन'च्या अंतर्गत लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सला अनुसरून वेळोवेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत. त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे.

देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आली होती. केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले.

दरम्यान, दिवाळीनंतर राज्यातील कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज दिवसभरात ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनारुग्णांची एकूण संख्या १८ लाख ०८ हजार ५५० इतकी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची ही संख्या अधिक चिंता वाढवणारी आहे. 

आज ६ हजार १८५ नव्या रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात आज ६ हजार १८५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात ८५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ८ हजार ५५० इतकी झाली आहे. यापैकी १६ लाख ७२ हजार ६२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये ४ हजार ८०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात १६ लाख ७२ हजार ६२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Web Title: Maharashtra: Existing lockdown restrictions extended till Dec 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.