Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:26 PM2024-11-20T20:26:28+5:302024-11-20T20:28:12+5:30
Maharashtra Exit Poll 2024: महत्वाचे म्हणजे, अधिकांश एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होताना दिसत आहे...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. पोलचे आकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारे असल्याचे संकेत मिळत आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या तुलनेत अधिक जागा मिळताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, अधिकांश एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होताना दिसत आहे.
उद्धव ठाकरे यांना धक्का...! -
मॅट्रीजच्या एक्झिट पोलनुसार, महायुती 150 ते 170 जागा मिळत आहेत. यांपैकी भाजपाला 89 ते 101, शिवसेने (एकनाथ शिंदे) 37 ते 45 आणि एनसीपी (अजित पवार) 17 ते 26 जागा जिंकू शकते. तर, महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळत आहेत. यात काँग्रेसला 39 ते 47, शिवसेना ठाकरे गटाला 21 ते 29 आणि एनसीपी (शरदचंद्र पवार) 35 ते 43 जिंकू शकतात. महत्वाचे म्हणजे 2019 मध्ये भाजपा आणि अखंड शिवसेना एकत्रित लढले होते. मात्र नंतर, उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि एनसीपीसोबत जाऊन सरकार स्थापन केले होते.
चाणक्यचा एक्झिट पोल -
या पोलनुसार, महायुती 152 ते 160 जागा मिळू शकतात. यात भाजपला 90, शिवसेनेला (शिंदे) 48, राष्ट्रवादी (अजित पवार) 22 जागा मिळत आहेत. याशिवया, महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळत आहेत. यात काँग्रेसला 63, शिवसेना (ठाकरे) 35, राष्ट्रवादी (शरद पवार) 40 तसेच इतरांना 6 ते 8 जागा मिळथ आहेत.
सर्व प्रमुख एक्झिट पोल एका क्लिकवर
https://www.lokmat.com/elections/maharashtra-assembly-election-2024/exit-poll/
असे होते जागा वाटप -
महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष 152 जागांवर निवडणूक लढवण्यार असल्याचे ठरले होते. महाविकास अघाडीतील काँग्रेसला 101 जागा मिळाल्या होत्या. एकीकडे, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 80 जागांवर निवडणूक लढली होती, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 96 जागा लढल्या होत्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एनसीपीला 52 तर पवार यांच्या एनसीपीला 87 जागा मिळाल्या होत्या.