Maharashtra Farmer: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ, किती मदत मिळणार..?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 05:37 PM2022-12-15T17:37:43+5:302022-12-15T17:40:52+5:30

शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Maharashtra Farmer: Big news for farmers! Double increase in compensation amount per hectare, how much help will farmer receive..? | Maharashtra Farmer: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ, किती मदत मिळणार..?

Maharashtra Farmer: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ, किती मदत मिळणार..?

googlenewsNext

Maharashtra Farmer: राज्यातील शेतकऱ्यांना (Maharashtra Farmer) सुखावणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Govt) सरकरने आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. 

जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत सरकारने शासन निर्णय घेतला आहे. शासन निर्णयानुसार, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत, तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13  हजार 500 ऐवजी आता 27  हजार रुपये मिळणार आहेत. तसेच, बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. 

शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नुकसानीसाठी 22232.45 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजूरी दिली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद पुरवणी मागण्याद्वारे करण्यात येईल. त्यानुसार हा निधी विभागीय आयुक्तांना किंवा शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. सरकारनं नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचे या शासन निर्णयात म्हटले आहे. 
 

Web Title: Maharashtra Farmer: Big news for farmers! Double increase in compensation amount per hectare, how much help will farmer receive..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.