प्राप्तिकर विवरणात महाराष्ट्र प्रथम
By Admin | Published: September 4, 2014 02:52 AM2014-09-04T02:52:12+5:302014-09-04T02:52:12+5:30
म्हणजे ई-रिटर्न पद्धतीने विवरण भरणा:यांच्या संख्येत महाराष्ट्राने बाजी मारत आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे.
मुंबई : पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ई-रिटर्नची उपलब्ध केलेली सेवा आणि एकूणच लोकांमध्ये वाढलेली जागरूकता या पाश्र्वभूमीवर यंदा मुदतीच्या आत विवरण भरणा:यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती पुढे आली असून, विशेष म्हणजे ई-रिटर्न पद्धतीने विवरण भरणा:यांच्या संख्येत महाराष्ट्राने बाजी मारत आपला अव्वल क्रमांक कायम राखला आहे.
2क्13-14 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून व्यावसायिक आणि नोकरदार अशा दोन्ही श्रेणींतून एकूण 22 लाख विवरणपत्रे ई-रिटर्न पद्धतीने दाखल झाली आहेत. यापाठोपाठ गुजरातचा क्रमांक असून तेथून 19 लाख 1क् हजार विवरणपत्रे ई-रिटर्नच्या माध्यमातून दाखल झाली, तर तिस:या क्रमांकावर कर्नाटक राज्यातून 16 लाखांच्या आसपास ई-रिटर्न दाखल झाले. सुधारलेली आर्थिक साक्षरता तसेच उत्पन्नात वाढ झाल्याने वेळेत ऑनलाइन विवरण भरणा:यांच्या संख्येमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा 26 टक्के वाढ नोंदली गेली आहे, तर नोकरदारांकरिता लागू असलेल्या ‘आयटीआर 1’ विवरणपत्र दाखल करणा:यांच्या संख्येत 33 टक्के वाढ नोंदविण्यात आली.
दरवर्षी 31 जुलै ही विवरण भरण्याची शेवटची तारीख असते. मात्र त्यास पाच ऑगस्टर्पयत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे ज्यांना करदायित्व आहे, अशा लोकांनी जर मुदतीनंतर रिटर्न दाखल केले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचेही संकेत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिले होते. यामुळेही मुदतीत विवरण भरण्याची संख्या वाढल्याचे मत प्राप्तिकर अधिका:यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
च्यंदा 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान एकूण 1,31,41,156 नागरिकांनी विवरणपत्रे ऑनलाइन दाखल केली. गेल्या वर्षी याच कालावधीत विवरण दाखल करणा:यांची संख्या 1,क्3,64,367 एवढी होती.
च्ही विवरणपत्रे ऑनलाइन पद्धतीने दाखल झाली होती. त्या तुलनेत ही वाढ 26.79 टक्के इतकी आहे. नोकरदारांच्या संख्येतही 33.2क् टक्क्यांची वाढ नोंदली गेली असून, गेल्या वर्षीच्या 57,81,327 च्या तुलनेत 77,क्क्,8क्9 नोकरदारांनी यंदा विवरणपत्रे दाखल केली.