Maharashtra Floods LIVE Updates: आपत्ती व्यवस्थापन करण्यात शासन, प्रशासन अपयशी; शरद पवार यांची टीका

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 10:40 AM2019-08-08T10:40:25+5:302019-08-08T17:32:05+5:30

Satara, Sangali and Kolhapur Flood Latest News: मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण ...

Maharashtra Flood Satara Sangali and Kolhapur floods Latest news and live updates in marathi | Maharashtra Floods LIVE Updates: आपत्ती व्यवस्थापन करण्यात शासन, प्रशासन अपयशी; शरद पवार यांची टीका

Maharashtra Floods LIVE Updates: आपत्ती व्यवस्थापन करण्यात शासन, प्रशासन अपयशी; शरद पवार यांची टीका

Next

Satara, Sangali and Kolhapur Flood Latest News: मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा याठिकाणी अनेक गावं पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. जवळपास 50 हजारांहून अधिक लोकांना प्रशासनाकडून सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. तर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर, नौदल, एअरफोर्स आणि एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. 

 

LIVE

Get Latest Updates

07:22 PM

ब्रह्मनाळ दुर्घटनेत अनिल गुरव या तरुणाने वाचवले ६ जणांचे प्राण

07:21 PM

सांगलीतील भिलवडी ग्रामस्थ ३ दिवसापासून पुरात अडकलेले; सरकारकडे केली मदतीची याचना

05:59 PM

माझे बाबा कुठे आहेत, असे विचारत चिमुकलीने फोडला टाहो

05:41 PM

Video - कोल्हापूरमधील व्हीनस कॉर्नर परिसराला पुराचा विळखा

05:29 PM

महामार्गावर अडकलेल्या वाहनधारकांना किणी ग्रामस्थांनी दिले जेवण

03:45 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमधील शिवाजीनगर भागाला भेट देऊन केली पुरस्थितीची पाहणी

03:27 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई पाहणी करून घेतला पूरस्थितीचा आढावा

03:06 PM

अलमट्टी धरणातून 5 लाख क्यूसेस पाणी सोडण्यास कर्नाटक तयार

02:53 PM

सांगली, सातारा, कोल्हापूरची मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी केली हवाई पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते. 

02:30 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंंत्र्यांकडून घेतला पूरस्थितीचा आढावा

01:53 PM

मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी

01:14 PM

NDRF सह एकूण 22 टीम पूरग्रस्तांच्या मदतीला

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एकूण 22 टीम महाराष्ट्रात दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफ 5, नौदल 14, कोस्टगार्ड 1, आर्मी 1 अशा 11 टीम सांगलीसाठी रवाना केल्या आहेत. 

12:19 PM

सांगलीत पुरग्रस्तांना वाचविणारी बोट उलटली

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट वाहत्या पाण्यात उलटली.  बोटीमध्ये अंदाजे 30 जण असल्याची माहिती. मदतकार्य सुरू. वाहून गेलेल्यांना वाचविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

12:10 PM

खा. छत्रपती संभाजी महाराजांकडून पुरग्रस्त भागातील लोकांना मदत

11:47 AM

गडचिरोलीतही पावसाचं थैमान, भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर, सांगली, सातारा यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातही पावसाने थैमान घातलं आहे. पर्लाकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. 

11:20 AM

पुरात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी NDRF प्रयत्नशील

11:16 AM

कोल्हापुरात पुरग्रस्तांच्या मदतीला Indian Navy सरसावली

10:52 AM

सातारा येथे NDRF टीमकडून पुरग्रस्तांना केलं रेस्क्यू

10:50 AM

पंजाबमधून NDRF च्या 5 टीम महाराष्ट्रात येणार

नवी दिल्ली - पंजाबमधून एनडीआऱएफच्या 5 टीम महाराष्ट्राच्या दिशेने रवाना करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे भागात पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी या टीम महाराष्ट्रात दाखल होतील. 

10:46 AM

मिरज-कराड दरम्यान चालविणार विशेष ट्रेन

मिरज-कराड दरम्यान विशेष ट्रेन पुढील 3 दिवस चालविण्यात येणार, पूरामुळे रस्ते वाहतूक कोलमडल्याने रेल्वे प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे.  

10:43 AM

पुणे-मिरज रेल्वे वाहतूक पावसामुळे बंद

सांगली भिलवडी येथील रेल्वे स्टेशन जवळील पुल पाण्याखाली गेल्याने मिरज-पुणे रेल्वे बुधवारी रात्रीपासून ठप्प झाली आहे. 

Web Title: Maharashtra Flood Satara Sangali and Kolhapur floods Latest news and live updates in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.