Shiv Chhatrapati Sports Awards 2023–24: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 09:35 IST2025-04-17T09:30:24+5:302025-04-17T09:35:06+5:30
Shiv Chhatrapati Sports Awards 2023–24 List: येत्या शुक्रवारी ८९ पुरस्कार विजेत्यांचा राज्याच्या क्रिडा विभागाकडून सन्मान केला जाणार आहे.

Shiv Chhatrapati Sports Awards 2023–24: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, शकुंतला खटावकर यांना जीवनगौरव!
राज्याच्या क्रीडा विभागाकडून बुधवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. माजी राष्ट्रीय महिला कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना २०२३-२४ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. यासह एकूण ८९ खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, ज्यात भारताचे क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल यांच्याही नावाचा समावेश आहे. येत्या १८ एप्रिल रोजी राज्याच्या क्रीडा विभागाकडून पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला जाणार आहे.
मुंबईत बुधवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासह, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शन- जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अशा एकूण ८९ पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
२०२३-२४ पुरस्कार्थींची यादी: शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार – शकुंतला खटावकर (पुणे).
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक : जिम्नॅस्टिक्स - प्रवीण ढगे (पुणे). कुस्ती - गोविंद पवार (पुणे), शिवशंकर भावले (लातूर). खो-खो - प्रवीण बागल (धाराशिव). दिव्यांग मार्गदर्शक – मानसिंग पाटील (कोल्हापूर, पॅरा जलतरण). थेट पुरस्कार – गणेश देवरुखकर (मुंबई उपनगर). जिजामाता पुरस्कार – रचना धोपेश्वर (पुणे, पॅरा ज्युदो).
खेळाडू (थेट पुरस्कार):
तिरंदाजी- अदिती स्वामी (सातारा), ओजस देवतळे (नागपूर), प्रथमेश जवकार (बुलढाणा),
ॲथलेटिक्स- ऐश्वर्या मिश्रा (मुंबई उपनगर), यमुना आत्माराम (पुणे), किरण भोसले (कोल्हापूर).
बॅडमिंटन- चिराग शेट्टी (मुंबई उपनगर), अक्षया वारंग (मुंबई शहर).
क्रिकेट- जेमिमा रॉड्रिग्ज (मुंबई शहर), देविका वैद्य (पुणे), राहुल त्रिपाठी (पुणे), ऋतुराज गायकवाड (पुणे), शिवम दुबे (मुंबई उपनगर), जितेश शर्मा (अमरावती), यशस्वी जयस्वाल (मुंबई शहर).
अश्वारोहण- हृदय छेडा (मुंबई उपनगर).
हॉकी- वैष्णवी फाळके (सातारा).
कबड्डी- अस्लम इनामदार (अहिल्यानगर), आकाश शिंदे (नाशिक).
रोइंग- धनंजय पांडे (रायगड).
नेमबाजी- किरण जाधव (सातारा).
जलतरण वॉटरपोलो- सांजली वानखेडे (अमरावती), उदय उत्तेकर (ठाणे).
तिरंदाजी- मंजिरी अलोणे (अमरावती), यशदीप भोगे (अमरावती).
बॉक्सिंग- अजय पेंडोर (नांदेड).
तलवारबाजी- श्रुती जोशी (नागपूर), धनंजय जाधव (सांगली).
कॅनोइंग व कयाकिंग- अंकुश पोवटे (सांगली).
सायकलिंग- ऋतिका गायकवाड (नाशिक), मयूर पवार (सातारा).
जिम्नॅस्टिक्स (आर्टिस्टिक्स)- ईशिता रेवाळे (मुंबई उपनगर).
रिदमिक जिम्नॅस्टिक्स- संयुक्ता काळे (ठाणे).
जिम्नॅस्टिक्स ट्रॅम्पोलिन– राही पाखले (ठाणे), आदर्श भोईर (ठाणे).
ज्युदो- श्रद्धा चोपडे (छत्रपती संभाजीनगर).