Maharashtra Government: ...त्यांना जी कारवाई करायचीय त्याला सामोरं जाण्यास तयार, एकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 03:41 PM2019-11-30T15:41:55+5:302019-11-30T15:43:09+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव आज 169 मतांनी विधानसभेत जिंकला असून,  हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांची याची घोषणा केली.

Maharashtra Government: Eknath Shinde agressive in vidhan sabha | Maharashtra Government: ...त्यांना जी कारवाई करायचीय त्याला सामोरं जाण्यास तयार, एकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा

Maharashtra Government: ...त्यांना जी कारवाई करायचीय त्याला सामोरं जाण्यास तयार, एकनाथ शिंदेंचा आक्रमक पवित्रा

googlenewsNext

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं विश्वासदर्शक ठराव आज 169 मतांनी विधानसभेत जिंकला असून,  हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटलांची याची घोषणा केली. या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी 4 आमदार तटस्थ राहिले. तर भाजपाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुतेक आमदारांनी सभागृहात मनोगत व्यक्त केलं. विशेष म्हणजे राज्यपालांनी शपथविधीदरम्यान काही गोष्टींवर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली होती. त्यालाच आज एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.

शिवतीर्थावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आदरणीय बाळासाहेबांच्या स्मारकासमोर, लाखो महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर या सरकारचा शपथविधी झालेला आहे.  राज्यपालांनी शपथ घेण्यावर आक्षेप घेतला. काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले सगळेच आणि मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून शपथ घेतली आहे. बाळासाहेबांना वंदन केल्याशिवाय कुठलीही शपथ किंबहुना कुठलं कामकाज आम्ही करत नाही.

कारण बाळासाहेबांमुळे आम्ही या सभागृहात आलो, राज्यपालांना जी काही कार्यवाही करायची असेल, त्याला सामोरं जाण्याची आपली तयारी असल्याचंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. आम्हाला 169 मतांचं बहुमत मिळालं आहे, त्यामुळे विरोधकांनी बहुमतासमोर थांबायला हवं होतं. उद्धव ठाकरेंचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो, असंही ते म्हणाले आहेत. आता विश्वासदर्शक ठरावाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक येणार आहे. 

Web Title: Maharashtra Government: Eknath Shinde agressive in vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.