"धनगर आरक्षणासाठी सकारात्मक, पण..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीनंतर रोखठोक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 07:11 PM2023-09-21T19:11:40+5:302023-09-21T19:13:06+5:30

धनगर समाजाच्या मागण्यांसदर्भात सह्याद्री अतिथीगृहात चर्चा

Maharashtra Government is positive for Dhangar reservation but says CM Eknath Shinde states problem after Meeting | "धनगर आरक्षणासाठी सकारात्मक, पण..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीनंतर रोखठोक विधान

"धनगर आरक्षणासाठी सकारात्मक, पण..."; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीनंतर रोखठोक विधान

googlenewsNext

Dhangar Reservation: शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे, तीच शासनाची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी सांगितले. याच वेळी यातील मेख काय यावरही त्यांनी प्रकाश टाकला. धनगर समाज आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री,  संबंधित पदाधिकारी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरुवातीला या बैठकीत धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी आपली मते मांडली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे. शासन घाईगडबडीत निर्णय घेऊ इच्छित नाही. न्यायालयात देखील टिकू शकेल असे आरक्षण धनगर समाजास देण्याची आमची भूमिका आहे. मध्य प्रदेश, बिहार आणि तेलंगणा या राज्यात शासन निर्णय काढून काही समाजांना जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्या राज्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्यासाठी धनगर समाजबांधवांच्या प्रतिनिधीसह शासकीय शिष्टमंडळ पाठविण्यात येईल. या शिष्टमंडळाचा अहवाल देशाचे ॲटर्नी जनरल यांच्याकडे पाठवून राज्य शासनाच्या पातळीवर त्याप्रमाणे निर्णय घेण्याबाबत मार्गदर्शन घेण्यात येईल."

"शासन निर्णय काढण्याच्या प्रक्रियेत काही अडचण आल्यास आवश्यकतेनुसार धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अभ्यास करण्यासाठी माजी न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीत धनगर समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल, असे सांगून तसेच आदिवासींच्या धर्तीवर धनगर बांधवांना लागू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ प्रभावीपणे देण्यात येईल. आंदोलनादरम्यान धनगर समाजबांधवांवर नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील", असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Government is positive for Dhangar reservation but says CM Eknath Shinde states problem after Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.