Maharashtra Government: सत्तास्थापनेच्या बैठका सोडून पवार अतिवृष्टीग्रस्तांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 06:17 AM2019-11-15T06:17:07+5:302019-11-15T06:17:29+5:30

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावासही त्यांनी भेट दिली.

Maharashtra Government: Pawar gone rainstorms, leaving power meetings | Maharashtra Government: सत्तास्थापनेच्या बैठका सोडून पवार अतिवृष्टीग्रस्तांसोबत

Maharashtra Government: सत्तास्थापनेच्या बैठका सोडून पवार अतिवृष्टीग्रस्तांसोबत

Next

योगेश पांडे 
नागपूर : राज्यात सत्ता स्थापनेसाठी तीन पक्षांच्या बैठका सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र गुरुवारी नागपूरकडे धाव घेतली व परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाची पाहणी केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावासही त्यांनी भेट दिली.
पवार यांनी काटोल तालुक्यातील गावांना भेटी देऊन नुकसानाची पाहणी केली. शरद पवार यांच्या दौऱ्याची कुणकुण लागल्याने शेकडो शेतकरी जमले. ‘साहेब शेतकरी अडचणीत आहे, सरकार लवकर स्थापन करा’ अशी भावना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी केली. पंचनामे करण्यास होणारी दिरंगाई, कृषी खात्यातील अधिकाºयांची अरेरावी, संत्री व्यापाºयांची मनमानी, पीक विमा कंपन्यांचे दुर्लक्ष अशा तक्रारींचा पाढाच त्यांनी वाचला. कापूस, सोयाबीन, धान पिकांचे व संत्र्यांचे नुकसान पाहून पवारही व्यथित झाले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असली तरी मोठी नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे केंद्र सरकारला मदत करावीच लागेल. दर हेक्टरी मदत व सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी मी पाठपुरावा करत असल्याचे सांगून पवार यांनी शेतकºयांना धीर दिला.
अतिवृष्टीमुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. कापसाची बोंडे वाढलीच नाहीत व कापूस कुजलेला आहे. संत्री व मोसंबीच्या पिकालाही मार पडला आहे. या संत्र्यांना बाजारात भाव मिळणार नाही. सोयाबीन, धानाचेही नुकसान झाले आहे. ते सोसण्याची त्यांची ताकद नाही. बँका, सोसायटीकडून घेतलेले कर्ज परत करण्यासाठी सरकारने नुकसानभरपाई दिली पाहिजे, असे मत शरद पवार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
ओल्या दुष्काळातले शेतकºयांचे दु:ख कळावे, व्यथा केंद्र सरकारपर्यंत पोहोचाव्यात म्हणून खानगावच्या शेतकºयांनी पवार यांना शेतातील वाळलेल्या पिकांचा गुच्छ दिला.
>अतिवृष्टीमुळे विदर्भात कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांसह त्याची पाहणी करताना शरद पवार व आ. अनिल देशमुख.

Web Title: Maharashtra Government: Pawar gone rainstorms, leaving power meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.