Maharashtra Government: सकाळी शांतता... दुपारनंतर वेग, राज्यातील राजकीय घडामोडींचा घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 04:36 AM2019-11-13T04:36:07+5:302019-11-13T04:36:41+5:30

उत्कंठा वाढविणाऱ्या सोमवारच्या वेगवान घडामोडींनंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रण दिले.

Maharashtra Government: Peace in the morning ... Speed in the afternoon, political events in the state | Maharashtra Government: सकाळी शांतता... दुपारनंतर वेग, राज्यातील राजकीय घडामोडींचा घटनाक्रम

Maharashtra Government: सकाळी शांतता... दुपारनंतर वेग, राज्यातील राजकीय घडामोडींचा घटनाक्रम

Next

उत्कंठा वाढविणाऱ्या सोमवारच्या वेगवान घडामोडींनंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रण दिले. त्यामुळे मंगळवार सकाळपासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडीच केंद्रस्थानी होत्या. सोमवारच्या तुलनेत काहीशा संथगतीने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींनी दुपारनंतर मात्र प्रचंड वेग घेतला, त्यावर नजर...

08.11 AM सकाळी १० वाजता काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होणार असल्याची माहिती. बैठकीनंतर अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे संकेत
10.11 AM‘कोशिश करनेवालों की हार नहीं होती’
(खासदार संजय राऊत यांचे रु ग्णालयातून टिष्ट्वट)
10.48 AM दिल्लीतील काँग्रेस कोअर कमिटीची बैठक रद्द
01.40 PM राज्यपालांनी केली राष्ट्रपती राजवटीची शिफारस
(वृत्त वाहिन्यांची माहिती)
02.25 PM राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केलेली नाही (राजभवनातून स्पष्टीकरण)
02.45 PM दिल्लीतून काँग्रेसचे नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे,
के. सी. वेणुगोपाल मुंबईत येऊन शरद पवारांना भेटणार आहेत, त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून एकत्रित निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून सरकार स्थापण्यासाठी शरद पवार यांना सर्वाधिकार - नवाब मलिक
03.30 PM राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याचे अधिकृतपणे स्पष्ट
04.25 PM राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्याची संधी द्यायला हवी होती; काँग्रेसची टीका
04.30 PM राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या शिफारशीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट. मात्र अधिकृत दुजोरा नाही
04.30 PM शरद पवार यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाल मुंबईत दाखल
05.35 PM महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; केंद्राच्या शिफारशीला राष्ट्रपतींची मंजुरी
06.05 PM राज्यपालांनी पाठवलेल्या शिफारशीनुसार सत्ता स्थापनेची कोंडी फुटणार नाही, हे समजल्यामुळे राष्ट्रपती राजवटीला मंजुरी; राष्ट्रपती भवनातून माहिती
06.20 PM राष्ट्रवादीने शिवसेनेला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव दिल्याची माध्यमांमध्ये चर्चा
06.55 PM यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक
07.05 PM राष्ट्रपती राजवट म्हणजे महाराष्ट्राचा घोर अपमान - राज ठाकरे
07.40 PM विधानसभा निकालानंतर शिवसेनेने सत्ता स्थापनेच्या पाठिंब्यासाठी अधिकृत प्रस्ताव सोमवारी दिला. त्या प्रस्तावावर लवकरच निर्णय घेतला जाईल - प्रफुल्ल पटेल
07.42 PM राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयावर काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका. काँग्रेसला राज्यपालांनी न बोलावल्याबद्दल पटेल यांची नाराजी
07.45 PM सर्वप्रथम राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बोलणी होतील. त्यानंतर शिवसेनेच्या प्रस्तावावर विचार - अहमद पटेल
07.55 PM सरकार कसे बनवायचे, यावर चर्चा झाल्याशिवाय शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत निर्णय नाही; शरद पवार आणि अहमद पटेल यांचे स्पष्टीकरण. किमान समान कार्यक्र मावर आधी चर्चा होणार; आघाडीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट
08.05 PM राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी ४८ तासांची मुदत मागितली. मात्र, त्यांनी ती मान्य केली नाही. सत्ता स्थापनेचा शिवसेनेचा दावा कायम. किमान समान कार्यक्र म ठरवल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल - उद्धव ठाकरे
08.05 PM भाजपने अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद कबूल केले होते. मात्र नंतर मला खोटे ठरवले - उद्धव ठाकरे
08.15 PM राज्यपालांनी ४८ तासांऐवजी ६ महिन्यांची मुदत दिली आहे. असा राज्यपाल सर्वांना लाभो; उद्धव ठाकरे यांचा टोला
08.20 PM सत्ता स्थापनेसाठी १४५ आकडा गाठण्यास भाजप प्रयत्नशील. त्यासाठी मी सर्वतोपरी मदत करेन. काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष शिवसेनेला उल्लू बनवत आहेत - नारायण राणे
08.40 PM जनादेश असूनही राज्यात सरकार स्थापन न होणे, राष्ट्रपती राजवट लागू होणे दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस
08.45 PM काही पक्षांच्या नेत्यांकडून जनादेशाचा अपमान. आमचे वेट अ‍ॅण्ड वॉच. भाजप सत्ता स्थापन करणार हे राणेंचे व्यक्तिगत मत - सुधीर मुनगंटीवार

Web Title: Maharashtra Government: Peace in the morning ... Speed in the afternoon, political events in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.