भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित सुधारणा महाराष्ट्र सरकारने फेटाळल्या
By admin | Published: January 28, 2016 07:35 PM2016-01-28T19:35:09+5:302016-01-28T19:35:09+5:30
मुंबई भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित सुधारणा महाराष्ट्र सरकारने मागे घेतल्या आहेत. या प्रस्तावित सुधारणांना होत असलेल्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - मुंबई भाडे नियंत्रण कायद्यातील प्रस्तावित सुधारणा महाराष्ट्र सरकारने मागे घेतल्या आहेत. या प्रस्तावित सुधारणांना होत असलेल्या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला आहे. मात्र. या कायद्यातील प्रस्तावित सुधारणा सरकारने फेटाळल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय चढाओढ सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. गिरगाव, गावदेवी, ऑपेरा हाऊस, खेतवाडी, मलबार हिल, वाळकेश्वर, महालक्ष्मी , ताडदेव आदी मध्य व दक्षिण मुंबईत सर्वाधिक भाडेकरू राहत आहेत.
नवीन कायद्यामुळे सध्याच्या भाड्यात तब्बल दोनशे पट वाढ होण्याची शक्यता होती त्यामुळे लोक नाराज असल्याचे चित्र होते.
मुंबईत एकूण २३ लाख १५ हजार भाडेकरू राहत आहेत. त्यातील जवळपास २ लाख भाडेकरु प्रस्तावित नियमानुसार वाढीव भाडे भरण्याच्या कक्षेत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन अहिर यांनी सांगीतले आहे.
भाडे नियंत्रण कायदा प्रस्तावित दुरुस्ती
- पागडी पद्धतीने राहणार्या भाडेकरूंना बाजारभावाप्रमाणे भाडं द्यावं लागेल
- 800 चौरस फुटांच्या वरची घरं आणि 550 चौरस फुटांवरच्या गाळ्यांना बदल लागू
- दक्षिण मुंबईतल्या सुमारे 3 लाख लोकांना फटका बसू शकतो
- छोट्या खोल्यांमध्ये राहणार्या भाडेकरूंना भीती की कालांतराने बदल त्यांनाही लागू होईल