नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्र सरकारने केरळला मदत करावी : प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 07:53 PM2018-08-22T19:53:24+5:302018-08-22T19:53:54+5:30
नैसर्गिक आपत्तीमध्ये केरळला महाराष्ट्र सरकारने मदत करावी असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.
पुणे : नैसर्गिक आपत्तीमध्ये केरळला महाराष्ट्र सरकारने मदत करावी असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. केरळ सरकारने काय मदत पाहिजे हे त्यांना विचारून आवश्यकतेनुसार मदत करावी.केरळमध्ये मदत पाठवताना केंद्र सरकारने जीएसटी लावू नये असेही त्यांनी सुचवले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, केरळ येथील नागरिकांना दलदलीत झोपता येत नसल्याने तशी व्यवस्था आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने ही व्यवस्था उभी करायला हवी.
पुढे ते म्हणाले की, गोमांस खाल्ल्यामुळे कोप वगैरे अशा वक्तव्यांकडे दुर्लक्ष करावे. केरळमधील जीवन पूर्वरत करणे आवश्यक आहे.लोकांनी मानसिकतेतून बाहेर पडाव. कोण कुठल्या धर्माचा, विचारसरणीचा ही चर्चा होऊ नये. मानवतेच्या दृष्टीने मदत करायला हवी असा विचार त्यांनी मांडला. केरळमधील १७ लाख घरे पडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा असेजी त्यांनी सुचवले.