महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:32 PM2020-09-08T14:32:53+5:302020-09-08T14:33:29+5:30
शिवनेता नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. या मुलाखतीत अध्ययन सुमनने आरोप केला होता, की कंगना ड्रग घेते आणि ती त्यालाही बळजबरी करत होती.
मुंबई - ठाकरे सरकारशी पंगा घेणाऱ्या कंगना रणौतच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता राज्य सरकारकारने कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनची चौकशी करायला सुरुवात केली आहे. गृह मंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीच्या आधारे हा तपास करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवनेता नेते सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी अध्ययन सुमनच्या एका जुन्या मुलाखतीची कॉपी महाराष्ट्र सरकारला सोपवली आहे. या मुलाखतीत अध्ययन सुमनने आरोप केला होता, की कंगना ड्रग घेते आणि ती त्यालाही बळजबरी करत होती. यानंतर सरकारणे चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस या प्रकरणाची चौकशी करतील
As per request submitted by MLAs Sunil Prabhu & Pratap Sarnaik, I answered in Assembly & said that Kangana Ranaut had relations with Adhyayan Suman, who in an interview said she takes drugs & also forced him to. Mumbai Police will look into details of this: Maharashtra Home Min pic.twitter.com/4ztVcqtP71
— ANI (@ANI) September 8, 2020
एनसीबीने ड्रग्सप्रकरणी कंगनाची चौकशी करावी -
महाराष्ट्र काँग्रेसने सोमवारीच कंगना रनौतशी संबंधित ड्रग लिंक्सची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने स्वतःच ड्रग घेत असल्याची कबुली एका व्हिडिओमध्ये दिली आहे. कंगना मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती, अशी विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वाची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगनाची ड्रग्ससंदर्भात चौकशी केली पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले होते.
कंगना-राऊत शाब्दिक वाद -
सध्या कंगना आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. याच दरम्यान कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यावर संजय राऊत यांनी तिला मुंबईत न येणाचा सल्ला दिला होता. यानंतर कंगनानेही मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कुणात हिंमत असेल तर त्याने अडवून दाखवावे, असे म्हटले होते. कालच केंद्र सरकारने कंगनाला 'वाय' दर्जाची सुरक्षा दिली आहे.
कंगना-राऊत सूर नरमले
शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यातील शब्दिक युद्धाने सोमवारी काहीसा नरमाईचा व खुलासेवजा सूर आळवला. एकीकडे कंगनाने 'मला महाराष्ट्र आवडतो' असे ट्विट करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. तर, आम्हाला शिवसेना प्रमुखांनी महिलांच्या सन्मानाची शिकवण दिल्याचे ट्विट राऊत यांनी केले. राऊत विरूद्ध राणौत वाद सध्या गाजत आहे.
कंगना सध्या हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी आहे. मुंबईत ती खारमध्ये राहते. तर वांद्रे येथील पाली हिलमध्ये तिचे मनिकर्णिका फिल्म नावाने कार्यालय आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!
खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी
आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ