घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 20:46 IST2020-08-26T20:34:01+5:302020-08-26T20:46:32+5:30
कोरोना विषाणूसह अनेक मुद्यांवर राज्य मंत्रिमंडळांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
मुंबई : राज्यात आता नवीन घर घेणाऱ्यासांठी खूशखबर आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत घर खरेदीवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात केली आहे. कोरोना विषाणूसह अनेक मुद्यांवर राज्य मंत्रिमंडळांची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मुंबईसह मोठ्या शहरात घर घेणाऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. घर खरेदीच्या प्रक्रियेत आकारण्यात येणाऱ्या स्टॅम्प ड्युटीमध्ये कपात करण्यात आली आहे. ही स्टॅम्प ड्युटी ५ टक्क्यांवरुन २ टक्क्यांवर येणार आहे. ही सवलत फक्त ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या दरम्यान हीच स्टॅम्प ड्युटी ३ टक्के असणार आहे. त्यामुळे मंदावलेला रिअल इस्टेट मार्केटला चालना मिळण्याची शक्यता आहे. तसेच, घर खरदी करु इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता देण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात...
• राज्याच्या शहरी भागातील आरोग्य सेवेसाठी ७ नियमित पदांच्या निर्मितीस मान्यता. संचालक, उपसंचालक आणि सहाय्यक संचालक या पदांचा समावेश.
• राज्यातील मच्छिमारांना मिळणार विशेष सानुग्रह अनुदान, मंत्रिमंडळाकडून अनुदान देण्यास मान्यता.
• वार्षिक कर भरणाऱ्या सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांना १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी मिळणार करमाफी. टाळेबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
• टाळेबंदीमुळे अतिरीक्त होणाऱ्या दूधापैकी प्रतिदिन १० लाख लिटर दुध स्विकारणे आणि रुपांतर योजना ऑक्टोबरपर्यंत राबविण्यास मान्यता.
• मुंबई महापालिका वगळून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील ८ महानगरपालिका व ७ नगरपालिका क्षेत्राकरिता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता.
• नाशिक जिल्ह्यातील काष्टी (ता.मालेगाव) येथे कृषि विज्ञान संकुल निर्मितीस मान्यता. याअंतर्गत शासकीय कृषि महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयांची होणार स्थापना.
• कोविड परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिली. सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
आणखी बातम्या...
"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"
'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट
'मी कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?', तरुणानं थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
धक्कादायक! Rail Yatri वेबसाइटवरून ७ लाख प्रवाशांचा डेटा लीक, डेबिट कार्ड-UPI चे होते डिटेल्स
आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...