चिंताजनक! बलात्कारानंतर महिलांच्या हत्येचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 02:09 AM2020-12-15T02:09:33+5:302020-12-15T06:47:11+5:30

९४ टक्के खटले प्रलंबित; आत्महत्येस प्रवृत्त करण्याचेही मोठे प्रमाण

Maharashtra has the highest number of murders of women after rape | चिंताजनक! बलात्कारानंतर महिलांच्या हत्येचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक

चिंताजनक! बलात्कारानंतर महिलांच्या हत्येचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक

Next

- मनीषा म्हात्रे

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामुहिक बलात्कारानंतर हत्येच्या घटनेने देश हादरला आहे. अशात उत्तरप्रदेशच नाही तर गेल्या वर्षभरात बलात्कार, सामुहिक बलात्कारानंतर २८६ महिलांची हत्या करण्यात आली आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक ४७ घटनांची नोंद आहे. त्याखालोखाल उत्तरप्रदेश आणि राजस्थानचा क्रमांक लागत असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने(एनसीआरबी) जारी केलेल्या अहवालातून समोर आली आहे. विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांमध्येही राज्य तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर  आहे. तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न गंभीर असताना राज्यात  दोन लाख सात हजार (९४ टक्के) खटले प्रलंबित आहेत. राज्यातील न्यायालयांनी वर्षभरात सुमारे १३ हजार खटले निकाली काढले असून त्यापैकी दिड हजार खटल्यांमधील आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला आहे.  तर साडेनऊ हजार खटल्यांमधील आरोपी पुरावे नसल्याने निर्दोष सुटले आहेत. यात महाराष्ट्रातील दोषसिद्धीचा दर १३.७ टक्के आहे.

२०१९ अत्याचाराचे गुन्हे
घटना    पीडित
बलात्कार
२,२९९    २,३०५
बलात्कार/हत्या
४७    ४७
अपहरण
६,९०६    ७,००८
विनयभंग
१०,४७२    १०,५१२
तस्करी
२२०    ६१४
आत्महत्येस प्रवृत्त
८०२    ८०८     
हुंडा बळी
१९६    १९६

चिमुकलेही असुरक्षित...
राज्यात अल्पवयीन मुलीही असुरक्षित आहेत. पॉक्सो अंतर्गत दाखल गुह्यांत देशात दर लाख लोकसंख्येमागे सरासरी सात गुन्हे घडतात. तर महाराष्ट्रात ११ गुन्हे घडत आहेत.

महाराष्ट्रातील दोषसिद्धीचा दर 
१३.७% 

विविध कारणांसाठी अपहरण, विनयभंग, हुंड्यासाठी छळ या गुन्ह्यांमध्येही राज्य तिसऱ्या, चौथ्या क्रमांकावर आहे

Web Title: Maharashtra has the highest number of murders of women after rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून