'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

By जयदीप दाभोळकर | Published: January 13, 2021 01:09 PM2021-01-13T13:09:16+5:302021-01-13T13:14:47+5:30

आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कसा असेल लसीकरणाचा कार्यक्रम

Maharashtra health minister clarifies how corona vaccination program will work and who wont get vaccine | 'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

googlenewsNext
ठळक मुद्देलसीकरणाच्या कार्यक्रमाला १६ जानेवारीपासून होणार सुरूवातकेंद्राच्या सूचनेनंतरच सर्वसामान्यांना लस मिळणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरवात होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातही लसीकरण्याच्या पार्श्वभूमीवर लसी पोहोचल्या आहेत. लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचं सांगत आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी आनंद व्यक्त केला. लस आपल्या पुण्याच्या मुख्य डेपोतून आपल्या आठ ठिकाणी पोहोचत आहेत. आठ डेप्युटी ऑफिसमध्ये मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद, नागपूर, अकोला या ठिकाणी लस पोहोचणार आहे. या ठिकाणी २ ते ८ अंश सेल्सिअस तापमान कायम ठेवता येईल असे बॉक्स घेऊन अधिकारी येतील. त्यांच्या जिल्ह्याच्या कोटा त्या ठिकाणाहून नेला जाणार. ही प्रक्रिया १४ तारखेपर्यंत पूर्ण होईल. १५ तारखेपर्यंत सर्व रुग्णालयांमध्ये कोल्ड चेन युनिट असलेल्या ठिकाणी या लसी पोहोचतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. तसंच यावेळी ही लस कोणाला देता येणार नाही याबाबतही त्यांनी माहिती दिली. 

"१६ तारखेला सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाइन पद्धतीनं या कार्यक्रमाची सुरूवात करणार आहेत. त्यानंतर देशभरात कार्यक्रमाला सुरूवात होईल. पहिल्या दिवशी ३५ हजार लोकांना लस देण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलं आहे. ही लसीकरण पूर्ण केलं जाईल. आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन लसीकरण करून घ्यावं," असं आवाहनही टोपे यांनी केलं. तसंच ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सिद्ध झाल्याचंही ते म्हणाले. आतापर्यंत राज्याला आलेले लसीचे डोस हे सुरुवातीच्या टप्प्यातील ५५ टक्के लोकांना पुरतील इतके आहेत. आपल्याला साडेसतरा लाख लसीचे डोस हवे आहेत. आपल्याकडे ९ लाख ६३ हजार सीरमचे आणि २० हजार भारत बायोटेकचे आले आहेत. हे प्रमाण कमी आहे. दोन डोसमध्ये चार आठवडे ते सहा आठवड्यांचं अंतर असणार आहे, अशाप्रकारे आपण हे काम पार पाडत आहोत, असंही ते म्हणाले.

"सर्वसामान्य नागरिकांना लस कधी द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. राज्याच्यावतीनं आपण हा प्रश्न विचारला पंतप्रधानंच्या आणि आरोग्यमंत्र्यांच्या चर्चेत विचारला. त्यावेळी त्यांनी सुरूवातीच्या टप्प्यातलं ६० टक्के लसीकरण पूर्ण केल्यानंतर यावर माहिती देणार असल्याचं म्हटलं. लसीकरणाचा कार्यक्रम हा केंद्राच्या अखत्यारितला आहे. त्यांच्या सूचनांनुसार राज्य सरकार हा कार्यक्रम राबवेल," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोणाला लस नाही?

"१८ वर्षांपेक्षा कमी वय असेलेल्यांना ही लस देण्यात येणार नाही. तसंच ज्या गर्भवती महिला, तसंच ज्या महिला स्तनपान करत आहेत किंवा ज्या लोकांना काही अॅलर्जी आहेत त्या लोकांना लस देण्यात येणार नाही, अशा प्रकारे हा लसीकरणाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत," 

Web Title: Maharashtra health minister clarifies how corona vaccination program will work and who wont get vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.