राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 10:40 AM2021-10-28T10:40:33+5:302021-10-28T10:41:13+5:30

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी ट्वीट करत दिली माहिती.

maharashtra home minister dilip walse patil tested coronavirus positive | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण

Next
ठळक मुद्देराज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ट्वीट करत दिली माहिती.

Dilip Walse Patil Covid Positive : गेल्या काही दिवसांपासून देशात आणि राज्यात कोरोनाबाधितांची संख्या (Coronavirus Patients) कमी होताना दिस आहे. अशातच राज्याचे गृहमंत्री (Maharashtra Home Minister) दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. वळसे पाटील यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली आहे.

"कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी चाचणी केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत," अशी माहिती वळसे-पाटील यांनी दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. "नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे," असंही ते म्हणाले.



दिलीप वळसे-पाटील यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहे. सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राज्याच्या गृहमंत्रीपदाची सूत्रं वळसे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

Web Title: maharashtra home minister dilip walse patil tested coronavirus positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.