महाराष्ट्र तापतोय!
By admin | Published: February 17, 2015 01:46 AM2015-02-17T01:46:04+5:302015-02-17T01:46:04+5:30
थंडीचा हंगाम संपल्यानंतर राज्यातील बहुसंख्य भाग तापण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी अनेक शहरांचे कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले.
पुणे : थंडीचा हंगाम संपल्यानंतर राज्यातील बहुसंख्य भाग तापण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी अनेक शहरांचे कमाल तापमान ३५ अंशाच्या पुढे गेले. मालेगावमध्ये सर्वाधिक ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या तापमानात वाढ होत आहे. सोमवारी मालेगावपाठोपाठ अहमदनगरचे तापमान ३७.७ आणि सोलापूरचे तापमान ३७.४ अंशावर गेले.
पुणे, नाशिक, सांगली, सातारा, उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, अकोला, चंद्रपूर या शहरांचे कमाल तापमान ३५ अंशाच्या वर गेले.
एकीकडे कमाल तापमानात वेगाने वाढ होत असतानाच सोमवारी काही शहरांचे किमान तापमान सरासरीच्या खाली गेले. राज्यात सर्वांत कमी ९.६ अंश सेल्सिअस तापमान अहमदनगरमध्ये नोंदविले गेले. (प्रतिनिधी)
प्रमुख शहरांमधील
कमाल तापमान
(अंश सेल्सिअमध्ये)
पुणे ३५.१, अहमदनगर ३७.७, जळगाव ३३.७, कोल्हापूर ३४.७, महाबळेश्वर ३१.६, मालेगाव ३८.२, नाशिक ३५.८, सांगली ३६.२, सातारा ३५, सोलापूर ३७.४, मुंबई २८.१, अलिबाग २८.७, रत्नागिरी ३२.८, डहाणू २८.९, उस्मानाबाद ३६.८, औरंगाबाद ३५.३, परभणी ३४.९, नांदेड ३६.५, अकोला ३६, अमरावती ३२.२, बुलडाणा ३४.६, चंद्रपूर ३५.२, नागपूर ३३.६, वाशिम ३४.४, वर्धा ३४.२, यवतमाळ ३३.