Maharashtra HSC 12th Result 2021: बारावीचा 'विक्रमी' निकाल जाहीर; ९९.६३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:18 PM2021-08-03T14:18:43+5:302021-08-03T14:39:11+5:30
Maharashtra HSC 12th Result 2021, MSBSHSE Board HSC 12th Result 2021 इयत्ता दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे.
पुणे : Maharashtra HSC 12th Result 2021 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी (दि.3) जाहीर करण्यात आला आहे. इयत्ता दहावीप्रमाणे बारावीच्या निकालाने सर्व विक्रम मोडीत काढले असून बारावीचा राज्य मंडळाचा निकाल 99 .63 टक्के लागला आहे. त्यात विज्ञान शाखेचा निकाल 99.45 टक्के वाणिज्य शाखेचा 99 .91 टक्के तर कला शाखेचा 99.83 लागला.शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 46 तर 12 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण मिळाले आहे. कोकणचा सर्वाधिक 99.81 टक्के आणि औरंगाबाद 99.34 टक्के सर्वात कमी असा निकाल लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात ८.९७ टक्के वाढ झाली आहे. Maharashtra HSC 12th Result 2021, MSBSHSE Board HSC 12th Result 2021
दहावीच्या निकालाप्रमाणे बारावीच्या निकालात गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी पाच संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे दहावी,अकरावी आणि बारावीतील अंतर्गत परीक्षांच्या गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा बारावी परीक्षेसाठी 13 लाख 17 हजार 76 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही.या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारसाठी एक संधी उपलब्ध राहिल,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
निकाल पाहण्यासााठी संकेतस्थळ
1) https://hscresult.11thadmission.org.in
2) https://msbshse.co.in
3) hscresult.mkcl.org
4) mahresult.nic.in.
5) http://lokmat.news18.com
बारावी निकालावर आक्षेप नोंदवता येणार
राज्य मंडळाकडून मंगळवारी जाहीर केल्या जाणा-या इयत्ता बारावी निकालावर विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा तक्रार नोंदवता येणार असून विभागीय मंडळ स्थरावरून संबंधित तक्रारींचे निराकर केले जाणार आहे,असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे प्रसिध्द केल्या जाणा-या बारावीच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने निर्णय दिला.परीक्षेचा निकाल सुधारित मुल्यमापन कार्यपध्दतीनुसार जाहीर झाल्यानंतर त्यावर विद्यार्थ्यांना काही आक्षेप किंवा तक्रारी असतील तर त्यांच्या निराकरणासाठी विभागीय मंडळ स्थरावर व्यवस्था निर्माण काण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रत्येक विभागीय मंडळ स्थरावर तक्रार निवारण करण्यासाठी अधिका-यांची नियुक्ती केली आहे. पुणे विभागीय सहसचिव प्रिया शिंदे पुणे विभागातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निराकरण करणार आहेत.