बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 05:10 PM2019-05-27T17:10:43+5:302019-05-27T17:14:40+5:30

दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल जाहीर होणार

Maharashtra HSC Result 2019 will be declared tommorrow | बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार

बारावीचा निकाल उद्या दुपारी जाहीर होणार

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या मंगळवार, दि. २८ मे २०१९ रोजी लागणार आहे. राज्य मंडळाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये पार पडली. 

सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल मेच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर झाले. त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले होते. राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी व ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थीनी आहेत. राज्यातील ९ हजार ७७१ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.

यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख ६९ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापाठोपाठ कला शाखेतून ४ लाख ८२ हजार ३७२ तर वाणिज्य शाखेतील ३ लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम घेतलेले ५८ हजार १२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. राज्य मंडळाच्या मुंबई विभागातून सर्वाधिक ३ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षा दिली. तर  कोकण विभागातून सर्वात कमी (३२ हजार ३६२) विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल-
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeduation.com

Web Title: Maharashtra HSC Result 2019 will be declared tommorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.