Maharashtra Budget 2019 Live Updates : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प; पोलिसांच्या घरांसाठी ३७५ कोटींची तरतूद
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 01:13 PM2019-02-27T13:13:06+5:302019-02-27T17:29:54+5:30
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती सरकारकडून आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत, तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सादर केला .
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची महारष्ट्रात 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, विद्यमान कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीधारकांनाही याचा लाभ होणार आहे. मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन इंडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 3 लक्ष 36 हजार कोटींची थेट विदेशी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
दरम्यान, लोकसभा निवडणूक वर्षात अंतरिम अर्थसंकल्प मांडणारे मुनगंटीवार हे चौथे वित्तमंत्री आहेत. याआधी जयंत पाटील (२००४), दिलीप वळसे-पाटील (२००९) आणि अजित पवार (२०१४) यांनी वित्तमंत्री या नात्याने अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता.
LIVE
04:43 PM
१९ हजार ७८४ कोटी रुपयांची महसूली तूट
राज्याचा यंदाचा अर्थसंकल्पात महसुली जमा 3 लक्ष 14 हजार 489 कोटी रूपयांची तर महसुली खर्च 3 लक्ष 34 हजार 273 कोटी रूपयांचा अंदाजित आहे. परिणामी 19 हजार 784 कोटी रूपयांची महसुली तूट अंदाजित आहे.#MahaBudget2019pic.twitter.com/gN6JeAZxhl
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
04:15 PM
राज्यावरील कर्जाचे प्रमाण राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 14.82 % एवढे आहे.
राज्यावरील कर्जाचे प्रमाण राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 14.82 % एवढे आहे. मागील पाच वर्षात कर्जाचे हे प्रमाण 15 टक्क्यांहून कमी करण्यात सरकारला यश लाभले आहे. #MahaBudget2019pic.twitter.com/6j3vMVAlDW
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
04:14 PM
परिणामी राज्यावरील एकूण कर्जाची रक्कम 4 लक्ष 14 हजार 411 कोटी एवढी झाली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या एकूण आकारमानाच्या तुलनेत हे कर्ज वाजवी प्रमाणात असल्याचा वित्तीय निर्देशांकाचा निष्कर्ष.
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
04:12 PM
यंदाच्या आर्थिक वर्षात कार्यक्रम खर्चाची रक्कम 99 हजार कोटी रूपये निश्चित. यात विशेष घटक योजनेच्या 9 हजार 208 कोटी, आदिवासी विकास योजनेच्या 8 हजार 431 कोटी तर जिल्हा वार्षिक योजनेच्या 9 हजार कोटी नियतव्ययाचा समावेश.#MahaBudget2019pic.twitter.com/tG0fDYmLBc
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
04:12 PM
पोलिसांसाठी राज्यात 1 लक्ष निवासस्थाने बांधण्याचे उद्दिष्ट
पोलीसांसाठी राज्यात 1 लक्ष निवासस्थाने बांधण्याचे उद्दिष्ट. यंदा 375 कोटींची तरतूद.#MahaBudget2019pic.twitter.com/YQE00vVQ71
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:47 PM
ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा 2 हजार 164 कोटींची तरतूद
ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत यंदा 2 हजार 164 कोटींची तरतूद. #MahaBudget2019pic.twitter.com/Q3M7AzqhDM
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:42 PM
जेट्टी बांधण्यासाठी यंदा 26 कोटींची तरतूद
सागरमाला योजनेंतर्गत सागरी किनारपट्टीवरील बंदरांमध्ये जलवाहतूकीसाठी जेट्टी बांधण्यासाठी यंदा 26 कोटींची तरतूद.#MahaBudget2019pic.twitter.com/i00nsjVrG4
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:41 PM
मुंबई उपनगरीय लोकल रेल्वे वाहतूक व्यवस्थेतील सुधारणेत राज्याचाही मोलाचा वाटा
मुंबई उपनगरीय लोकल रेल्वे वाहतूक व्यवस्थेतील सुधारणेत राज्याचाही मोलाचा वाटा. परिवहन प्रकल्प टप्पा-3 साठी मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन मार्फत 55 हजार कोटींची कामे.#MahaBudget2019pic.twitter.com/5tvqBrx659
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:41 PM
विमानतळ विकास मोहिम वेगात
अमरावती, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, जळगांव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग विमानतळ विकास मोहिम वेगात.#MahaBudget2019pic.twitter.com/L42YG4E7Ou
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:40 PM
100 % गावांच्या विदयुतीकरणाचे लक्ष्य पूर्ण
100 % गावांच्या विदयुतीकरणाचे लक्ष्य पूर्ण. ऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधांसाठी यंदा 6 हजार 306 कोटींची तरतूद.#MahaBudget2019pic.twitter.com/PPbAObxMLR
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:39 PM
शासनाच्या विविध विभागांशी संबंधित सेवा नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी 60 कोटींची तरतूद.#MahaBudget2019pic.twitter.com/1koAzpkrah
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:35 PM
राज्यातील न्यायालय इमारती, न्यायाधीशांची निवासस्थाने आदींच्या प्रयोजनार्थ यंदा 725 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.#MahaBudget2019pic.twitter.com/X32QG1yApL
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:18 PM
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची महारष्ट्रात 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींची महारष्ट्रात 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी. विद्यमान कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्तीधारकांनाही लाभ.#MahaBudget2019pic.twitter.com/aUN2fXgtep
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:17 PM
आदिवासी विकास योजनेच्या ८ हजार ४३१ कोटींची तरतूद
#MahaBudget2019#अर्थसंकल्प२०१९
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2019
यंदाच्या आर्थिक वर्षात कार्यक्रम खर्चाची रक्कम ९९ हजार कोटी रूपये निश्चित.
यात विशेष घटक योजनेच्या ९ हजार २०८ कोटी,
आदिवासी विकास योजनेच्या ८ हजार ४३१ कोटी तर
जिल्हा वार्षिक योजनेच्या ९ हजार कोटी नियतव्ययाचा समावेश - अर्थमंत्री @SMungantiwar
03:16 PM
राज्यातील किल्यांचे जतन व संवर्धन उपक्रमासाठी निधीची तरतूद
राज्यातील किल्यांचे जतन व संवर्धन उपक्रमासाठी निधीची तरतूद. रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना. प्रत्येकी 14 किल्यांचा 2 टप्प्यात विकास.#MahaBudget2019pic.twitter.com/lNurpqWNoT
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:15 PM
'नव्या कल्पना रूजवून आम्ही आलो सामोरे, देशभरातच वाहू लागले प्रगतीचे वारे...'
#MahaBudget2019
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2019
नव्या कल्पना रूजवून आम्ही आलो सामोरे,
देशभरातच वाहू लागले प्रगतीचे वारे...
या प्रगतीने जगी तळपला अपुला भारत देश,
अर्थ, निती अन् सामर्थ्याची मोठी झाली रेष..
या वेगाला पुन्हा देवू, या महाराष्ट्राची साद,
हिमालयाला जणू लाभावी सह्याद्रीची साथ - अर्थमंत्री @SMungantiwar
03:12 PM
#MahaBudget2019#अर्थसंकल्प२०१९
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2019
वेतन आयोगाच्या तरतूदी लागू केल्यानंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काहीसा ताण आल्याने ही तूट स्वाभाविकच. मात्र अनावश्यक खर्चात बचत आणि महसुली वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा प्रयत्न असेल- अर्थमंत्री @SMungantiwar
03:06 PM
राज्यातील 385 शहरातील नागरिकांकरता 6 हजार 895 कोटींची तरतूद
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील 385 शहरातील नागरिकांकरता 6 हजार 895 कोटींची तरतूद.#MahaBudget2019pic.twitter.com/9OAwc8kIjw
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:03 PM
औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागातील 14 जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने तांदूळ व गहू पुरविण्यासाठी 896 कोटी 63 लक्ष रूपयांची तरतूद.#MahaBudget2019pic.twitter.com/y3AchyZxIn
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
03:02 PM
#MahaBudget2019#अर्थसंकल्प२०१९
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2019
एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत बालक, गरोदर व स्तनदा माता यांना पोषण आहार देण्यासाठी १ हजार ९७ कोटींची तरतूद - अर्थमंत्री @SMungantiwar
03:01 PM
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल वाढविणार.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भागभांडवल 400 कोटींनी वाढविणार.#MahaBudget2019pic.twitter.com/jlCKdGNjkw
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
02:58 PM
महिला उद्योजकांसाठी नवतेजस्विनी योजना
#MahaBudget2019#अर्थसंकल्प२०१९
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2019
महिला व बालविकासाच्या विविध कल्याणकारी योजनांसाठी २ हजार ९२१ कोटींची तरतूद.
ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी नवतेजस्विनी योजना - अर्थमंत्री @SMungantiwar
02:55 PM
#MahaBudget2019#अर्थसंकल्प२०१९
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2019
राज्यात स्वच्छता अभियानांतर्गत २५४ शहरामंध्ये २ हजार ७०३ कोटीरूपयांचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रगतीपथावर - अर्थमंत्री @SMungantiwar
02:54 PM
पेयजल योजनांसाठी ७५०कोटी रूपयांची तरतूद
- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमासाठी राज्याचा वाटा म्हणून ७५०कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
#MahaBudget2019#अर्थसंकल्प२०१९
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2019
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमासाठी राज्याचा वाटा म्हणून ७५०कोटी रूपयांची तरतूद- अर्थमंत्री @SMungantiwar
02:49 PM
‘प्रमोद महाजन कौशल्य व विकास अभियान’
राज्याच्या गतिमान विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या युवकांना ‘प्रमोद महाजन कौशल्य व विकास अभियान’ अंतर्गत सक्षमीकरणासाठी यंदा 90 कोटींची तरतूद.#MahaBudget2019pic.twitter.com/ZwA0cQ9D4N
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
02:48 PM
राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान
राज्यातील दूध, कांदा, तूर, हरभरा, धान उत्पादकांना विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान.#MahaBudget2019pic.twitter.com/SZXXZ9qLiQ
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
02:47 PM
शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज योजनेमार्फत राज्यातला शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत निधी उपलब्ध करून देणार. #MahaBudget2019pic.twitter.com/6QoQYBlLrG
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
02:46 PM
1 लक्ष 30 हजार शेततळी पूर्ण
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत आजवर 1 लक्ष 30 हजार शेततळी पूर्ण. यंदा 5 हजार 187 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.#MahaBudget2019pic.twitter.com/wcobrv5c1h
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
02:45 PM
जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा 1500 कोटी रूपयांची तरतूद
क्रांतिकारी ठरलेल्या जलयुक्त शिवार अभियानासाठी यंदा 1500 कोटी रूपयांची तरतूद. #MahaBudget2019pic.twitter.com/8CxLmZY3vm
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
02:38 PM
राज्यातील रस्त्यांचा लक्षणीय विकास
- राज्यातील रस्त्यांचा लक्षणीय विकास. मागील साडे चार वर्षात 12 हजार 984 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती.
राज्यातील रस्त्यांचा लक्षणीय विकास. मागील साडे चार वर्षात 12 हजार 984 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती.#MahaBudget2019pic.twitter.com/DBGC6hvh9K
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
02:36 PM
- सामाजिक न्यायाच्या माध्यमातून विषमतामुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास.
02:36 PM
- वाढत्या शहरीकरणानुरूप सुविधा, शेतकरी व युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य.
02:35 PM
शेततळे, सिंचन विहिरींवर भर...
राज्यात शेती व शेतीपूरक व्यवसायाला प्राथमिकता देण्यासाठी शेततळे, सिंचन विहिरींवर भर देण्यात येणार आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेत आजवर 1 लक्ष 30 हजार शेततळी पूर्ण. यंदा 5 हजार 187 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित.#MahaBudget2019pic.twitter.com/wcobrv5c1h
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) February 27, 2019
01:18 PM
थोड्याच वेळात सादर होणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प
थोड्याच वेळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.