महाराष्ट्र ‘मेफेड्रोन’ तस्करीचे केंद्र, तीन वर्षांत देशातील मेफेड्रोनच्या प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे राज्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 05:49 IST2025-03-30T05:47:08+5:302025-03-30T05:49:41+5:30

‘Mephedrone’ Smuggling: महाराष्ट्र हे मेफेड्रोन तस्करीचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील मेफेड्रोनच्या एकूण प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे या राज्यात घडली आहेत.

Maharashtra is the hub of ‘mephedrone’ smuggling, 72 to 96% of the country’s mephedrone cases in three years were in the state | महाराष्ट्र ‘मेफेड्रोन’ तस्करीचे केंद्र, तीन वर्षांत देशातील मेफेड्रोनच्या प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे राज्यात

महाराष्ट्र ‘मेफेड्रोन’ तस्करीचे केंद्र, तीन वर्षांत देशातील मेफेड्रोनच्या प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे राज्यात

- हरीश गुप्ता
नवी दिल्ली - महाराष्ट्र हे मेफेड्रोन तस्करीचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील मेफेड्रोनच्या एकूण प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे या राज्यात घडली आहेत. गृह मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, सिंथेटिक ड्रग्जशी संबंधित गुन्ह्यांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.

महाराष्ट्रात मेफेड्रोनची १,४८६ प्रकरणे नोंदली गेली. २०२२ मध्ये २९०, २०२३ मध्ये ६४७ आणि २०२४ मध्ये ५४९ प्रकरणे नोंदली गेली. त्याच कालावधीत २,२५० जणांना अटक करण्यात आली. राज्याच्या बंदरांमधून, महामार्गांवर आणि बेकायदेशीरपणे प्रयोगशाळांमधून याचा प्रवास होत आहे.

मुंबई आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ३,५०९ आणि २०२१ मध्ये ७,०८९ वरून २०२२ मध्ये ११,०४६ पर्यंत सायकोट्रॉपिक पदार्थांची प्रकरणे वाढली. त्यामुळे एक प्रमुख वितरण केंद्र म्हणून याकडे बघितले जाऊ लागले. 

गांजामध्ये राज्याचा वाटा कमी
- मेफेड्रोन तस्करीत महाराष्ट्राचे वर्चस्व असले तरी गांजा प्रकरणांमध्ये राज्याचा वाटा कमी आहे. एकूण १.६४ लाख गांजा प्रकरणात २.४ लाख आरोपींना अटक करण्यात आली. यात राज्याचा वाटा सुमारे २-३% आहे. 
- महाराष्ट्रात गांजा प्रकरणांची एकूण संख्या ५०९१ आहे. ज्यामध्ये ६२८५ अटक आहेत. २०२२ मध्ये १,३५० आणि २०२३ मध्ये १,८४९ वरून २०२४ मध्ये १,८९२ पर्यंत प्रकरणे वाढली. ही ४० टक्के वाढ होती. 
-२०२२ मध्ये १,६७८ आणि २०२३ मध्ये २,२६१ जणांना अटक झाली. २०२४ मध्ये २,३४६ जणांना अटक झाली. केरळसारख्या इतर राज्यांमध्ये ८१,२४७ प्रकरणे समोर आली. उत्तर प्रदेशात १६,३४२ प्रकरणे आणि १८,९०४ जणांना अटक करण्यात आली.

देशात आढळली १,९०२ मेफेड्रोन प्रकरणे 
सुरक्षा दलांनी राज्यात कार्यरत असलेल्या या प्रकाराचा शोध घेण्यासाठी प्रयत्न तीव्र केले आहेत. 
२०२२-२०२४ दरम्यान देशभरात एकूण १,९०२ मेफेड्रोन प्रकरणे आढळली. यात ३,०१२ जणांना अटक करण्यात आली.

Web Title: Maharashtra is the hub of ‘mephedrone’ smuggling, 72 to 96% of the country’s mephedrone cases in three years were in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.