महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ठाकरेंचा निर्णय, दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 06:48 PM2019-12-07T18:48:33+5:302019-12-07T18:48:52+5:30

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. 

Maharashtra-Karnataka border questioning Thackeray, the responsibility of coordinating the two ministers | महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ठाकरेंचा निर्णय, दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ठाकरेंचा निर्णय, दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी

Next

मुंबई :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांची समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले आहेत. स्वत: मुख्यमंत्री यासंदर्भामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज मंत्रालयात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर तातडीने सीमाप्रश्नी मंत्रालयात बैठक बोलावून एकीकरण समितीला निमंत्रण दिले, याप्रश्नी महाराष्ट्राची बाजू अधिक मजबूत करण्याची आपली इच्छा असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावे. सीमाभागातील गावे महाराष्ट्रात येण्यासाठी सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात राज्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी कालबद्ध रीतीने जाण्याच्या देखील सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सीमाप्रश्नासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सध्या कायदेशीर लढा सुरू आहे. हा खटला जलदगतीने संपविण्यासाठी राज्य शासनातर्फे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी या खटल्यातील वकिलांची तातडीने संयुक्त बैठक घेण्यात येईल. तसेच खटल्याच्या पुढील सुनावणीस ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे यांनी बाजू मांडावी, यासाठी त्यांना विनंती करण्यात येईल. 

Web Title: Maharashtra-Karnataka border questioning Thackeray, the responsibility of coordinating the two ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.