Maharashtra Kesari 2023 : अवघ्या दोन मिनिटात चितपट; शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 08:11 PM2023-01-14T20:11:37+5:302023-01-14T21:08:44+5:30

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला अवघ्या दोन मिनिटात अस्मान दाखवलं.

Maharashtra Kesari 2023 : Chitpat in two minutes; Shivraj Rakshe won 'Maharashtra Kesari' | Maharashtra Kesari 2023 : अवघ्या दोन मिनिटात चितपट; शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी

Maharashtra Kesari 2023 : अवघ्या दोन मिनिटात चितपट; शिवराज राक्षे 'महाराष्ट्र केसरी'चा मानकरी

googlenewsNext


Maharashtra Kesari 2023 :  गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेचा थरार रंगला होता. आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम लढत पार पडली. या अंतिम लढतीत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला चितपट करत मानाच्या महाराष्ट्र केसरी 2023 किताबावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, अंतिम सामन्यात काही मिनिटातच निकाल लागला.

पुण्यातील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत 65वी महाराष्ट्र केसही स्पर्धा पार पडली. उपांत्य लढतीत माती विभागातून महेंद्र गायकवाडने अंतिम सामन्यात धडक मारली, तर गादी विभागातून शिवराज राक्षे अंतिम सामन्यात आला. यानंतर या दोन्ही मल्लांमध्ये गादीवर अंतिम सामना पार पडला. दोन्ही पैलवान तुलनेने सारखेच असल्यामुळे सामना खूप वेळ चालेल अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, अनुभवी शिवराज राक्षेने महेंद्रला चितपट करत अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला.

यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, क्रिडा मंत्री गिरीष महाजन आणि राष्ट्रीय कुस्तीसंघाचे अध्यक्ष बृजभुषण चरण सिंह उपस्थित होते. त्यांनी शिवराज राक्षेला मानाची गदा दिली. यावेळी शिवराजच्या सोबतींनी आणि त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. शिवराज राक्षेच्या रुपाने महाराष्ट्राला नवीन महाराष्ट्र केसरी मिळाला आहे.
 

Web Title: Maharashtra Kesari 2023 : Chitpat in two minutes; Shivraj Rakshe won 'Maharashtra Kesari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.