Maharashtra Mumbai Rain Live: मुंबईत कुठं कुठं पाणी साचलंय, जाणून घ्या महत्वाची माहिती...

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:06 AM2022-07-06T09:06:21+5:302022-07-06T13:44:20+5:30

Maharashtara Mumbai Rain Live Updates: राज्याच्या पश्चिम किनारपट्टीभागात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस ...

maharashtra konkan mumbai rains live updates in marathi imd red alert weather forecast | Maharashtra Mumbai Rain Live: मुंबईत कुठं कुठं पाणी साचलंय, जाणून घ्या महत्वाची माहिती...

Maharashtra Mumbai Rain Live: मुंबईत कुठं कुठं पाणी साचलंय, जाणून घ्या महत्वाची माहिती...

Next

Maharashtara Mumbai Rain Live Updates: राज्याच्या पश्चिम किनारपट्टीभागात पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. पालघर जिल्ह्यात मंगळवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरातही पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. लोणावळ्यात गेल्या २४ तासांत १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गोंदिया जिल्ह्यात चार तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुंबईसह राज्यातील पावसाचे अपडेट्स...

Maharashtara Mumbai Rain Live Updates:

LIVE

Get Latest Updates

04:50 PM

उल्हासनगरात कोसळलेले झाड रस्त्यातून हटविताना स्ट्रीट लाईटचा खांब पडून शाळेकरी मुलगी जखमी

03:35 PM

दुपारी 3 वाजता उपग्रह निरीक्षण; उत्तर कोकणात मध्यम ते मधूनमधून तीव्र सरी

01:43 PM

मुंबईत कुठं कुठं पाणी साचलंय? जाणून घ्या...

>> मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तसेच नीलम जंक्शन हा सकल भाग असल्याने अर्धा फूट उंचीपर्यंत सदर ठिकाणी पाणी साचलेले असून वाहतूक अंमलदार सदर ठिकाणी हजर आहे व वाहतूक सुरळीत करून घेण्यात येत आहे.

>> मानखुर्द रेल्वे पुलावर दक्षिणेकडे पाणी साचले, स्लीप रोड, वाहतूक मंदावली.  मानखुर्द चौकी.

>> दादर टीटी जंक्शन येथे पाणी साचले. मेन होल MCGM स्टाफने उघडले आहेत. मात्र या जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांची मदत हवी आहे.  

>> दादर टी टी सर्कलमध्ये पाणी साचल्याने वाहतूक गोखले रोडने वळवण्यात आली आहे.

>> सी लिंक गेटवर पाणी साचले, दक्षिणेकडे, वाहतूक संथ.  वरळी चौकी.
 
>> हिंदमाता जंक्शनवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली.  भोईवाडा चौकी.

>> सक्कर पंचायत, वडाळा येथे ०.५ फूट पाणी साचले, वाहतूक संथ.  भोईवाडा चौकी.

>> किंग सर्कल, माटुंगा येथे ०.५ फूट पाणी साचले, वाहतूक संथ.  माटुंगा चौकी.

>> मंचरजी जोशी चौक जंक्शनवर २.०० फूट पाणी साचले, वाहतूक मंदावली. माटुंगा चौकी

>> कमानी जंक्शन कुर्ला येथे ०.५ फूट पाणी साचले, वाहतूक संथ. कुर्ला चौकी

>> खार भुयारी मार्गावर पाणी साचले, वाहतूक मंदावली. वाकोला चौकी.

>> मफतलाल जंक्शनवर वाहतूक संथ, दक्षिण बाँड

>> एव्हरर्ड नगर येथे वाहतूक संथ

>> खड्डे आणि BKC कनेक्टरमुळे वाहतूक संथ गतीने चालत आहे अडथळे, वाहतूक चुनाभट्टी

>> असल्फा बस स्टॉप जंक्शनवर 2.00 फूट पाणी साचले आहे, वाहतूक संथ आहे. घाटकोपर चौकी

>> क्रिस्टल हाऊसवर पाणी साचले, पवई 1.0 फूट, वाहतूक संथ. पवई चौकी

01:40 PM

मुंबईत शेख मेस्त्री दर्गा रोड येथे २ फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीची गती मंदावली आहे.

11:11 AM

विरारमध्ये गुडघाभर पाणी साचले

विरारच्या पश्चिम भागात स्टेशन ते बोळींज रोडवर गुडघाभर पाणी साचलं आहे. तसंच रस्त्यालगतच्या सोसायटीमध्येही पाणी शिरलं आहे. 

11:06 AM

पावसामुळे बेस्ट मार्गात बदल

10:37 AM

10:25 AM

अंबरनाथमध्ये स्टेशन रोडवर मोठं झाड कोसळलं

10:23 AM

09:51 AM

मुंबईत दादर पूर्व भागात साचलं पावसाचं पाणी...

मुंबईतील दादर पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथे पावसाचं पाणी साचलं असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागरिकांना गुडघाभर साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.

09:47 AM

मुंबईत गेल्या २४ तासांत विविध भागांत झालेली पावसाची नोंद पुढीलप्रमाणे...

09:40 AM

मुंबईत दुपारी हायटाइड

मुंबईच्या समुद्रात दुपारी ४ वाजून ४९ मिनिटांनी मोठी भरती येणार आहे. यात ३.२७ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबईत सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे दुपारपर्यंत पाऊस कायम राहिल्यास सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.

09:27 AM

सातारा प्रतापगड रस्त्यावर दरड कोसळली, प्रतापगडाकडे जाणारी वाहतूक बंद 

09:24 AM

रात्रभर झालेल्या पावसाने नालासोपारा जलमय

नालासोपारा पूर्वेकडील स्टेशन रोड, सेंट्रल पार्क, तुळींज रोड परिसरात पावसाचं पाणी साचलं आहे.

09:21 AM

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव आणि सडक-अर्जुनी भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक १५०.७ मिमी पावसाची नोंद सडक-अर्जुनी तालुक्यात झाली आहे. 

09:18 AM

पावसाचे शक्तिप्रदर्शन...! मुंबईसह कोकणला झोडपले; पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा

09:18 AM

मुंबईतील लोकलसेवा सध्या सुरळीत

09:08 AM

मुंबईच्या वांद्रे येथील पावसाची दृश्य

09:07 AM

मुंबईसह कोकणात ऑरेंज अर्लट

पुढील चार दिवस राज्यासाठी मुसळधार पावसाचे असणार असून मुंबई आणि कोकणासाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: maharashtra konkan mumbai rains live updates in marathi imd red alert weather forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.