MLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 10:01 AM2018-05-24T10:01:10+5:302018-05-24T14:09:57+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी आज मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीत आतापर्यंत परभणी-हिंगोली, चंद्रपूर, अमरावती विधान परिषदेच्या जागांचा निकाल जाहीर झाला आहे. 

Maharashtra Legislative Council election LIVE- Bena Bajoria, Ramdas Amtkar of BJP, Praveen Pote wins | MLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी

MLC ELETION updates- शिवसेनेचे विप्लव बाजोरिया, भाजपाचे रामदास आंबटकर, प्रवीण पोटे विजयी

मुंबई- स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांचे निकाल आज जाहीर झालेत. अमरावती आणि चंद्रपुरात भाजपानं बाजी मारली असून, नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तसेच कोकणातील जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. विधान परिषद निवडणुकीत भाजपा 2, सेना 2, राष्ट्रवादी 1 जागांवर विजयी झाले आहेत. परभणी-हिंगोलीच्या विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव केला आहे. अमरावती विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे 441 मतांनी विजयी झाले आहेत. चंद्रपुरात भाजपाचे रामदास आंबटकर 550 मतं मिळवून विजयी झाले असून, काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ यांना 462  मतं मिळाली आहेत. तर नाशिकमध्येही शिवसेनेच्या नरेंद्र दराडे(400) यांनी विजय मिळवला असून, राष्ट्रवादीच्या शिवाजी सहाणे यांना 231 मते मिळाली आहेत. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत सुनील तटकरे विजयी झाले आहेत, त्यांनी शिवसेनेच्या राजीव साबळेंचा दारुण पराभव केेला आहे. नारायण राणेंच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे विजयी झाले आहेत. 

  • विधानपरिषद निवडणूक 2018 संपूर्ण निकाल
     

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना - नरेंद्र दराडे (412 मतं)
राष्ट्रवादी - शिवाजी सहाणे (219 मतं)
 शिवसेना 193 मतांनी विजयी

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था
राष्ट्रवादी - अनिकेत तटकरे (421 मतं)
शिवसेना - राजीव साबळे (221 मतं)
राष्ट्रवादी 200 मतांनी विजयी

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था
शिवसेना - विप्लव बाजोरिया (256 मतं)
काँग्रेस - सुरेश देशमुख (221 मतं)
 शिवसेना 35 मतांनी विजयी

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा - प्रविण पोटे-पाटील (458 मतं)
काँग्रेस - अनिल मधोगरिया (17 मतं)
 भाजप 441 मतांनी विजयी

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था
भाजपा - रामदास आंबटकर (550 मतं)
काँग्रेस - इंद्रकुमार सराफ (462 मतं)
भाजप 88 मतांनी विजयी

Web Title: Maharashtra Legislative Council election LIVE- Bena Bajoria, Ramdas Amtkar of BJP, Praveen Pote wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.