Uddhav Thackeray on Maharashtra Lockdown : परदेशात कडक लॉकडाऊन, मात्र आपण कात्रीत सापडलोय - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 09:27 PM2021-04-02T21:27:05+5:302021-04-02T21:43:46+5:30
Maharashtra Lockdown: पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा एकप्रकारे इशारा दिला आहे.
मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही. परदेशात कडक लॉकडाऊन, मात्र आपण कात्रीत सापडलो आहे. पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतो आहे, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही. पुढील दोन दिवसात दुसरा पर्याय दिसला नाही तर जग जे करतंय तोच पर्याय स्वीकारावा लागेल, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा एकप्रकारे इशारा दिला आहे.
लॉकडाऊन करायंच की नाही, तर परदेशातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये बिकट अवस्था, फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा लॉकडाऊन आहे. केनिया, यूकेसारख्या अनेक देशात कडक लॉकडाऊन आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, अनेक देशांमधील परिस्थिती नाजूक आहे. फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन लागू, या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम म्हणजेच वर्क फॉर्म होमच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद, सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी, अशी फ्रान्समधील परिस्थिती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
(राज्यात कडक निर्बंध लादणार, दोन दिवसांत नियमावली जाहीर करू; मुख्यमंत्र्यांची माहिती)
हंगेरीमध्येही वर्क फ्रॉम होम, डेनमार्कमध्येही तीच परिस्थिती, ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवण्यास सुरुवात झाली आहे. बेल्जियमने एक महिना परत लॉकडाऊन लागू केलाय. पोर्तूगाल सरकारने शहराशहरामधील नागरिकांची ये-जा थांबवली आहेत. आयर्लंडमध्ये डिसेंबर पासून कडक निर्बंध आहे. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहे. यूकेतही अडीच-तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर शिथिलता दिली जाते. इटली, जर्मनीतही तीच अवस्था आहे. लॉकडाऊन घातक आहे. पण एका कात्रीत आपण सापडलो आहे. एका बाजूला अर्थचक्र आहे. अर्थचक्र चालू ठेवले तर अनर्थ घडतोय, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे :-
- पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय, पण आज लॉकडाऊन जाहीर करत नाही
- राज्यात कडक निर्बंध लादण्यात येणार
- लॉकडाऊन करणार का? याचं उत्तर मी अजून देणार नाही
- रस्त्यांवर उतरा, पण नागरिकांच्या मदतीसाठी, विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला
- लॉकडाऊनबाबत सल्ला देणाऱ्या उद्योगपतीलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा टोला
- विरोधी पक्षाच्या लॉकडाऊनबाबतच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांची टीका
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सात कलमी कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय
- कोरोना काळात राजकारण नको.
- सर्वपक्षांनी राज्य सरकारला सहकार्य करावं
- रुग्ण वाढ थांबवण्यासाठी सध्या कुठलाही उपाय नाही
- लसीकरणानंतरही कोरोना संसर्गाची भीती कायम
- कोरोनाची लस घेतली तरी मास्क अनिवार्य.
- अनेक डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी कोरोनाच्या विळाख्यात
- मला व्हिलन ठरवलं तरी मी काम करत राहणार
- सध्या मुंबईतील रुग्णसंख्या दररोज साडे आठ हजारांवर पोहोचली आहे.
- राज्यात एकही रुग्ण लपवला नाही आणि लपवणार नाही.