Maharashtra Lockdown News: गुड न्यूज! आजपासून २१ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल; पाहा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:20 AM2021-06-01T07:20:37+5:302021-06-01T07:23:41+5:30
Maharashtra Lockdown News: पावसाळी कामांसाठीच्या साहित्याची दुकानेही सुरू
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या कमी होत असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाबाबत जिल्हावार आढावा घेऊन १० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या जिल्ह्यांत सवलती दिल्या आहेत. त्यानुसार १ जूनपासून २१ जिल्ह्यांत मॉल सोडून आवश्यक व अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी २पर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल, रेस्टारंटही घरपोच सेवेकरिता सुरू राहणार आहेत.
२९ मे २०२१च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेला पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरण्यात आली आहे. अकोला व चंद्रपूर जिल्हे रेड झोनमध्येच असल्याने निर्बंध शिथिल होणार नाहीत. नाशिकला सलून, सराफ दुकाने, दूध विक्री, शासकीय कार्यालये, भाजी विक्री, रेशन दुकाने, बँका, पोस्ट, मुद्रांक कार्यालये निर्बंधासह सुरू राहणार आहेत.
१० टक्क्यांवर पॉझिटिव्हिटी
जिल्हा पॉझिटिव्हिटी ऑक्सिजन रेट % बेड %
सातारा २०.९४ ८९.५४
उस्मानाबाद १८.१६ ६०
रत्नागिरी १७.६९ ६८.२१
सांगली १७.३५ ४९
सिंधुदुर्ग १७ ६७
बीड १६.१३ ६०
औरंगाबाद १५.०४ ४५
परभणी १४.६१ ३३
रायगड १४.१० ४२
कोल्हापूर १३.९ ७६
अकोला ११.७४ ७०
मुंबई ११.२७ ३५
चंद्रपूर १०.८६ ५५
पुणे १०.८ ३५
१० टक्क्यांखाली पॉझिटिव्हिटी
जिल्हा पॉझिटिव्हिटी ऑक्सिजन रेट % बेड %
वर्धा ८.५२ १५
गोंदिया ८.५ ०३
अहमदनगर ८.४६ ५०
सोलापूर ८.३५ ५१.२२
नाशिक ८.२१ २१.८१
ठाणे ७.८५ १५
भंडारा ७.७ १८.८०
बुलडाणा ७.२३ ५०
हिंगोली ७.२० २८.५०
गडचिरोली ६.६२ १२.५४
पालघर १६.७८ -
अमरावती ५.४४ ४३
नागपूर ५.६ २०
जालना ५.२६ ३०
लातूर ४.५ ४०
नंदुरबार ४.८ ४०
नांदेड ४.५० ५६.८३
वाशिम ४.२ १५
यवतमाळ ३.५० ४०
जळगाव २.८६ २१
धुळे २.८१ १८
नाशिकला सलून, सराफ दुकाने सुरू
नाशिकला सलून, सराफ दुकाने, कृषिविषयक आस्थापना, दूध विक्री, शासकीय कार्यालये, भाजी विक्री, रेशन दुकाने, बँका, पोस्ट, मुद्रांक कार्यालये निर्बंधासह सुरू राहणार आहेत.
विदर्भातील १० जिल्ह्यांत सवलती
अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ दुपारी २ पर्यंत सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू व शनिवार व रविवार पूर्णत: बंद.
मराठवाड्यालाही मिळाला दिलासा
जालना जिल्ह्यात दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. हिंगोलीत शनिवार-रविवार वगळून इतर दिवशी सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.
पुण्यात जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच दुकानांना दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
मॉल सोडून आवश्यक सेवेतील दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू
अकोला व चंद्रपूर जिल्हे रेड झोनमध्येच