Maharashtra Lockdown: आणखी कडक निर्बंध की लॉकडाऊनच?, मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार; मंत्र्यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 07:02 PM2021-04-19T19:02:07+5:302021-04-19T19:06:03+5:30

Maharashtra Lockdown: संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असून, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असल्याचे सांगितले जात आहे.

maharashtra lockdown vijay wadettiwar says cm uddhav thackeray likely to take decision in 2 days about strict lockdown | Maharashtra Lockdown: आणखी कडक निर्बंध की लॉकडाऊनच?, मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार; मंत्र्यांचं सूचक विधान

Maharashtra Lockdown: आणखी कडक निर्बंध की लॉकडाऊनच?, मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार; मंत्र्यांचं सूचक विधान

googlenewsNext
ठळक मुद्देकडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणारलॉकडाउन १०० टक्के करा अशी मागणीकोरोनाच्या लाटेचा अंदाज चुकला

मुंबई: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ मे २०२१ पर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, तरीही कोरोनाचे गांभीर्य जनतेमध्ये नसल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असून, राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असे मोठे आणि महत्त्वाचे विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. (vijay wadettiwar says cm uddhav thackeray likely to take decision in 2 days about strict lockdown in state)

विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतील, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे, याची माहिती घेतली जात आहे, असेही ते म्हणाले. 

“आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज

कडक लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार

राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. राज्यात १ मे सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी व निर्बंध लागू करण्यात आली असली, तरी गरज पडल्यास निर्बंधांचा कालावधी वाढवावा लागणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. १ मे नंतरही निर्बंध कायम राहणार असल्याचे संकेत वडेट्टीवार यांनी दिले.

लॉकडाउन १०० टक्के करा अशी मागणी

संचारबंदीचा फायदा सध्या पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही. आपण लॉकडाउन केलेला नाही. अनेक व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध होता. व्यापारी किंवा जीवनाश्यक वस्तूंची, इतर लहान दुकाने असणारेही १०० टक्के लॉकडाऊन करा, अशी मागणी करत आहे. अनेक जिल्ह्यांमध्येही लोक मागणी करत असून, आम्ही मुख्यमंत्र्यांना यासंबंधी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री इतरांशी चर्चा करुन तो निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. 

आता एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकर: अनिल परब

कोरोनाच्या लाटेचा अंदाज चुकला

करोनाची दुसरी लाट सौम्य असेल असा अंदाज होता पण हा अंदाज चूकला. राज्यातील स्थिती आज गंभीर आहे. त्यामुळेच कडक लॉकडाऊनची गरज असून व्यापारी व छोट्या दुकानदारांचाही विरोध आता मावळत चालला आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे, असे वडेट्टीवार यांनी  सांगितले. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी करोनाच्या लढाईसाठी ठाकरे सरकारने साडे पाच हजार कोटी रुपये राखीव ठेवले असल्याची माहिती दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ एप्रिल रात्री ८ वाजेपासून पुढचे १५ दिवस राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये पूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली असून फक्त जीवनावश्यक वस्तू आणि सेवांशी संबंधित व्यक्तींना प्रवासाची आणि उद्योगांना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच, विविध समाजघटकांसाठी अर्थसहाय्य करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 
 

Web Title: maharashtra lockdown vijay wadettiwar says cm uddhav thackeray likely to take decision in 2 days about strict lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.